Hot Posts

6/recent/ticker-posts

मागासवर्गीय अनुदानित वसतीगृह कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणीसाठी आ.बच्चु कडू यांच्या प्रयत्नाला यश

 मागासवर्गीय अनुदानित वसतीगृह कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणीसाठी आ.बच्चु कडू यांच्या प्रयत्नाला यश

 मुख्यमंत्री यांनी  घेतला वेतन श्रेणीचा निर्णय



सोलापूर (कटुसत्य वृत्त):  दिनांक २२ नोव्हेंबर २०२३ रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली व आमदार बच्चु कडू यांच्या प्रयत्नामुळे अनुदानित वसतीगृह कर्मचाऱ्यांना वेतनश्रेणी  लागू करण्यासंबंधी जी शासकीय बैठक आयोजित करण्यात आली होती.  या बैठकीमध्ये वसतीगृहाच्या चारही पदांना (अधीक्षक, स्वयंपाकी, चौकीदार,मदतनीस) वेतनश्रेणी लागू करणे संबंधी परिपूर्ण प्रस्ताव तयार करून लवकरात लवकर मंत्रिमंडळ बैठकीसमोर ( कॅबिनेट) ठेवण्यात यावा आणि राज्यातील अनुसूचित जातीच्या मुलामुली करिता चालवल्या जाणाऱ्या आश्रमशाळा, त्यांची सलग्न वसतीगृह, कर्मचारी व विजाभजच्या आश्रम शाळा व त्यांची सलग्न वसतीगृह कर्मचारी आणि मागासवर्गीय अनुदानित वसतीगृह कर्मचारी यांच्या समान काम समान वेतन या न्याय तत्त्वानुसार वेतनातील फरक दूर करून समानता आणावी यावर चर्चा करून निर्णय घेण्यात आला. या बैठकीला राज्यातल्या सर्व विभागातील सचिव, वित्त विभागाचे सचिव व राज्याचे मुख्य सचिव उपस्थित होते. वसतीगृह कर्मचाऱ्यांना न्याय देण्याची भूमिका या बैठकीमध्ये घेतल्यामुळे बच्चू कडू व सामाजिक न्याय विभागाचे सचिव सन्माननीय सुमंत भांगे, उपसचिव डिंगळे यांचा महाराष्ट्र राज्य अनुदानित वसतीगृह कर्मचारी संघटनेच्या वतीने मंत्रालयमध्ये भेट घेऊन सत्कार करण्यात आला‌. याप्रसंगी संघटनेचे  प्रदेश अध्यक्ष मारुती कांबळे, येळीकर, शालिनीताई मयूर, जावरकर, प्रदीप वाकपैंजण, विशाल कदम  ,कुंनघाडकर , चुन्नीलाल पवार, झुंजारराव,  देसले  सिधेवाड नांदेड,विशाल कदम, प्रदीप कुमार मयूर , तुळशीराम भोवर ,प्रीती गोस्वामी व वस्तीग्रह पदाधिकारी उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments