Hot Posts

6/recent/ticker-posts

पत्नीशी वडिलांचे अनैतिक संबंध असल्याचा संशय घेऊन मुलाने वडिलांचा जीव घेतला

पत्नीशी वडिलांचे अनैतिक संबंध असल्याचा संशय घेऊन मुलाने वडिलांचा जीव घेतला.



मध्य प्रदेश कुलडोंगरी (कटूसत्य वृत्त):- नातेसंबंधांना काळिमा फासणारी घटना मध्य प्रदेशमधील सागर जिल्ह्यात उघडकीस आली आहे. या घटनेत एका मुलाने वडिलांवर केलेल्या क्रूरतेने खळबळ उडाली आहे. सुनेशी म्हणजे त्याच्या पत्नीशी वडिलांचे अनैतिक संबंध असल्याचा संशय घेऊन मुलाने वडिलांचा जीव घेतला.

वडील शेतातील झोपडीत झोपले असताना मुलाने त्यांच्यावर हातोड्याने प्राणघातक हल्ला केला. या घटनेत जखमी झालेल्या वडिलांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच केसली पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टेमसाठी पाठवला आहे. या शिवाय पोलिसांनी आरोपी मुलालाही अटक केली आहे. आपल्या पत्नीशी वडिलांचे अनैतिक संबंध असल्याचा मुलाला संशय होता, त्यातून त्याने हे भयंकर पाऊल उचलल्याचे सांगण्यात येत आहे.

हे प्रकरण सागर जिल्ह्यातील केसली पोलीस स्टेशन हद्दीतील कुलडोंगरी गावात घडले आहे. इथे राहणारे इमरत सिंह गौर हे त्यांच्या शेतात झोपडी बांधून राहत होते. तर मुलगा शैतान सिंह आणि त्याची पत्नी गावात राहत होते. आपल्या वडिलांचे आपल्या पत्नीशी अनैतिक संबंध असल्याचा संशय मुलाला आला होता. याच संशयातून आरोपी मुलाने स्वतःच्या वडिलांना लोखंडी हातोड्याने व काठीने मारहाण केली आणि त्यांचा खून केला.

शेतात झोपलेल्या वडिलांवर जीवघेणा हल्ला

मिळालेल्या माहितीनुसार, मृत इमरत सिंह गौर हे शेतात बांधलेल्या झोपडीमध्ये झोपले होते. वडिलांचे पत्नीशी अनैतिक संबंध असल्याचा संशय घेऊन आरोपी शैतान सिंह याने शेतात झोपलेल्या वडिलांवर काठी व हातोड्याने हल्ला केला. यात गंभीर जखमी झालेल्या वडिलांचा जागीच मृत्यू झाला. वडिलांचा खून केल्यानंतर आरोपी मुलगा फरार झाला. गावकऱ्यांकडून माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला, त्यानंतर आरोपी मुलाला अटक करण्यात आली. आरोपी मुलाने गुन्ह्याची कबुली दिली असून त्यामागचं कारणही स्वतः सांगितलं.

मुलाला न्यायालयात हजर करणार

बायकोच्या चारित्र्यावर संशय आल्याने हा खून केल्याचं मुलाने केसली पोलीस ठाण्यात सांगितलं. अनैतिक संबंधाच्या संशयावरून वडिलांवर हातोड्याने आणि काठीने वार करून हत्या करणाऱ्या आरोपी मुलास पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीने चौकशीदरम्यान सांगितलं की, त्याला त्याच्या वडिलांवर संशय होता, त्यामुळे त्याने हे पाऊल उचललं. पोलीस आरोपीला अटक करून न्यायालयात हजर करणार आहेत.

Reactions

Post a Comment

0 Comments