अमित शाह आणि अजित पवार च्या भेटीवर पहा काय म्हणले जरांगे पाटील
छत्रपती संभाजीनगर (कटूसत्य वृत्त):- : राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न चांगलाच तापला आहे. मराठा समाजाला आरक्षण द्यावं यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला चाळीस दिवसांचा वेळ दिला होता.
शुक्रवारी अजित पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीवर जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दादांनी शाह यांची भेट का घेतली माहित नाही. ही भेट वैयक्तिक होती की आरक्षणाबाबत याची देखील माहिती नाही. मात्र या भेटीत जर आरक्षणावर चर्चा झाली असेल तर चांगली गोष्ट आहे. त्यांनी आरक्षणावर बोललं पाहिजे. आरक्षण हा मराठा समाजाच्या अस्तेचा विषय आहे, असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
दरम्यान उपोषणामुळे जरांगे पाटील यांची प्रकृती खालावल्यानं त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगरमध्ये उपचार सुरू आहेत. त्यांनी आता स्वत:च आपल्या प्रकृतीबाबत प्रसारमाध्यमांना माहिती दिली. आज महत्त्वाच्या तपासण्या करण्यात येणार आहेत. उद्या कदाचित मला डिसचार्ज मिळेल. उद्या दहा वाजेपर्यंत मी रुग्णालयातून बाहेर पडण्याची शक्यता आहे, असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
0 Comments