Hot Posts

6/recent/ticker-posts

दिवाळी फेस्टिव्हल निमित्त सोलापुरात खासदार चषक ....!

 दिवाळी फेस्टिव्हल निमित्त सोलापुरात खासदार चषक  ....! 

जिल्हा सचिव राजेश कळमणकर यांची माहिती.....!! 

सोलापूर (कटू सत्य वृत्त): -क्रीडा भारती, भारतीय मजदूर संघ, आणि विश्वकर्मा क्रीडा समिती सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 20 ते 27 नोव्हेंबर दरम्यान शहरातील विविध मैदानावर सहा खेळांच्या जिल्हास्तरीय स्पर्धा डॉ. जय सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी खासदार चषक अर्थात फुटबॉल व कबड्डीच्या स्पर्धा निमंत्रित संघामध्ये होणार असल्याची माहिती क्रीडा भारतीचे जिल्हा सचिव राजेश कळमणकर यांनी श्रमिक पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. 

पत्रकार परिषदेत पुढे बोलताना कळमणकर म्हणाले की, " महिला कबड्डी राज्यस्तरीय, फुटबॉल ,सेपक टकरा, बॉल बॅडमिंटन,  हँडबॉल डॉल,  बॉल च्या स्पर्धा  जिल्हास्तरावर होणार आहेत. क्रीडा भारती ही संस्था संपूर्ण देशात विविध खेळाच्या विकासासाठी विविध योजना राबवणारी प्रशस्त संस्था आहे. 

सोलापूर शहरात गेले वीस वर्षापासून फुटबॉल,  रायफल शूटिंग,  बॉल बॅडमिंटन  या खेळाच्या विकासासाठी क्रीडा भारती शाखा प्रयत्न करत आहे. या शाखेच्या वतीने शहरात विविध भागात प्रशिक्षण केंद्रे सुरू आहेत. दरवर्षी उन्हाळ्यात व दिवाळीच्या सुट्टीत क्रीडा शिबिर आयोजित करण्यात येते. तसेच फुटबॉल व कबड्डी या खेळाच्या स्पर्धा राज्यस्तरावर आयोजन यशस्वीपणे केले जाते. 

धुळे सोलापुरातील वसुंधरा कॉलेजमध्ये निमंत्रित संघाचे दरम्यान राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सर्वसामान्य बाद पद्धतीने होतील यासाठी सोलापूर, मुंबई,  कोल्हापूर ,पुणे,  परभणी,  सांगली,  औरंगाबाद आणि नाशिक इत्यादी जिल्ह्यातील वीस संघानी नावे नोंदविली आहेत. 

कबड्डीसाठी प्रथम पारितोषिक 60 हजार व चषक, द्वितीय संघास 30 हजार व चषक आणि तृतीय संघास 10 हजार व चषक देण्यात येणार आहे. फुटबॉलचे सामने जुळे सोलापुरातील भंडारी क्रीडा संकुलामध्ये होणार आहेत. दिनांक 21, आणि 22 नोव्हेंबर रोजी सेपक टकरा च्या स्पर्धा दत्त चौकातील सरस्वती मंदिर प्रशालेत होणार आहेत. 

या स्पर्धेमध्ये सोलापूर शहर मंगळवेढा,  पंढरपूर ,माळशिरस या भागातील संघ सहभागी झाले असून 14 वर्षाखालील मुले- मुली गट तर महिला व पुरुष खुल्या गटात स्पर्धा होणार आहेत. 

प्रत्येक गटात हा संघ सहभागी होणार आहेत. 

दिनांक 23, व 24 नोव्हेंबर दरम्यान 14 ते 17 वर्षाखालील मुले व मुलीच्या गटात बॉल बॅडमिंटन स्पर्धा सरस्वती मंदिर प्रशाला दत्त चौक गणपती घाट या ठिकाणी होणार आहेत. प्रत्येक गटातील संघास प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे बक्षीस व चषक तर उपविजेते संघातील खेळाडूंना परत देण्यात येणार आहे. 

हँडबॉल व डॉल बॉल स्पर्धा अश्विनी हॉस्पिटल जवळील राजीव गांधी स्टेडियम येथे होणार आहेत. या स्पर्धेतील प्रत्येक गटातील प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या  संघास चषक, विजेते व उपजेते संघातील खेळाडूंना पदक देण्यात येणार आहे. 

एक आठवडाभर चालणारे या स्पर्धेत साधारणपणे 1000 खेळाडूंचा सहभाग असणार आहे. या स्पर्धेसाठी सुधीर देव, मदन गायकवाड,  सुदेश मालप, संतोष जाधव ,मोरे ,शरण वांगी, राजीव माने, रवी चव्हाण, वीरेश अंगडी,  अजय उतकम, आणि कोळी या प्रशिक्षकांचे सहकार्य लाभत आहे. तरी सर्व खेळाडूंनी शांतपणे सहभाग घेऊन आपली खेळाडूवृत्ती दाखवून द्यावी .असे आवाहन क्रीडा भारतीच्या वतीने करण्यात आले आहे. 

या पत्रकार परिषदेस डॉ.  विलास हरपाळे, राजेश कळमणकर डॉ.  अंबादास  पांढरे, ज्ञानेश्वर मायकल,  उज्वल मलजी,  संजय सावंत ,सुदेश मालप, मदन गायकवाड ,संतोष जाधव, आणि अरुण उपाध्ये आदी उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments