रिपब्लिकन सेनेच्या वतीने
संविधान बचाव यात्रेनिमित्त दि. 24 नोव्हेंबर रोजी सोलापुरात होणार जाहीर सभा...!
सकाळी दहा वाजता निघणार भव्य रॅली...!!
सोलापूर (कटूसत्य वृत्त): -रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सर सेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नूतन प्रदेशाध्यक्ष काकासाहेब खंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात संविधान बचाव यात्रा काढण्यात येत असून दीक्षाभूमी नागपूर येथून संविधान बचाव यात्रेस 24 ऑक्टोबर पासून सुरुवात झाली असून ही यात्रा 24 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी दहा वाजता सोलापुरात येत असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथून सकाळी दहा वाजता भव्य रॅलीच्या माध्यमातून महापुरुषांना वंदन करण्यात येणार असल्याची माहिती रिपब्लिकन सेनेचे जिल्हा अध्यक्ष अँड.हर्षवर्धन मल्लाप्पा शिंदे यांनी श्रमिक पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
पत्रकार परिषदेत पुढे बोलताना शिंदे म्हणाले की, " रिपब्लिकन सेनेच्यावतीने लोकशाहीचा जागर..! संविधानाचा आदर..! हा संदेश सर्वदूर पोहोचवण्यासाठी दीक्षाभूमी नागपूर ते चैत्यभूमी मुंबई अशी संविधान बचाव यात्रा दिनांक 24 ऑक्टोबर 2023 पासून सुरू झाले असून 24 नोव्हेंबर रोजी ही यात्रा सोलापुरात दाखल होत असून या यात्रेच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जगातील जवळपास 60 राज्य घटनांचा सखोल अभ्यास, चिंतन, आणि मनन करून या देशाला संविधान अर्पित केले. भारतीय संविधान हे केवळ लोकशाही, अधिकार ,कर्तव्य अंतर्भूत असलेले पुस्तक नसून तात्विक दृष्ट्या देशातील शेवटच्या घटकाची सर्वांगीण काळजी वाहणारा तो एक मुलगामी तत्त्वग्रंथ आहे. 25 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संविधान सभेत शेवटच्या भाषणात म्हणाले, " संविधान कितीही चांगले असो, ते राबविण्याची जबाबदारी यांच्यावर आहे, तेच जर अप्रमाणिक असतील तर ते वाईट ठरल्याशिवाय राहणार नाही. तसेच संविधान कितीही वाईट असो, ते राबविण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे. ते जर प्रामाणिक असतील तर ते चांगले ठरल्याशिवाय राहणार नाही. यातून बाबासाहेबांनी लोकशाही देशांमध्ये रुजवण्यासाठी राष्ट्रहित समाज हित डोळ्यासमोर ठेवून स्वातंत्र्य, समता, बंधुता याचा मोठ्या प्रमाणात प्रचार आणि प्रसार पुणे अत्यंत गरजेचे असल्याचे सांगितले आहे. परंतु सध्या सगळीकडे मंदिर, मशीद, झेंडे,भोंगे या विषयावरच कलह गाजत आहेत. सरकारने वाढती महागाई, बेरोजगारी, ठाणे खाजगीकरणाला आळा घातला पाहिजे. मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून तरुणांच्या हाताला काम दिले पाहिजे तरच स्वातंत्र्याची 100 री उत्साहात, दिमाखात साजरी करता येईल.
परंतु ज्या संविधानाने देशाला स्वातंत्र्य, समता, बंधुता हा महान विचार दिला तेच संविधान आज बदलण्याची भाषा केली जात आहे. हाच धोका ओळखून समाजातील सर्व जाती धर्मातील नागरिकांनी जागरूकतेने एकसंघ होऊन लढा उभा करणे गरजेचे आहे. समाजामध्ये संविधानिक मूल्य रुजवावीत आणि अस्मिता प्रत्येक नागरिकांमध्ये निर्माण होऊन संविधानिक संस्कृती निर्माण होऊन समाजामध्ये संविधान साक्षरता आणि संविधानिक जागरूकता निर्माण व्हावी. याच हेतूने डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू तथा रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर, आणि प्रदेशाध्यक्ष काकासाहेब खंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली लोकशाही मार्गाने 24 ऑक्टोबर 2023 पासून संविधान बचाव यात्रेस सुरुवात झाली असून मी संविधान बचाव यात्रा दीक्षाभूमी ते चैत्यभूमी सर्व राज्यातील जिल्ह्यामधून जाणार आहे. या यात्रेचा समारोप 6 डिसेंबर 2023 रोजी चैत्यभूमी दादर या ठिकाणी होणार आहे. तरी भारतीय संविधान जिवंत राहणे गरजेचे आहे. यासाठी संविधान वाचवा देश वाचवा ही आर्त हाक दिली असून सर्वांनी या संविधान बचाव यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन रिपब्लिकन सेनेच्या वतीने हर्षवर्धन शिंदे यांनी केले आहे.
ही यात्रा 24 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी दहा वाजता सोलापुरात दाखल झाल्यानंतर भव्य रॅली निघणार असून या रॅलीस डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथून प्रारंभ होणार असून कर्मवीर भाऊराव पाटील सम्राट चौक, अस्थिविहार (प्रेरणाभूमी )मिलिंद नगर बुधवार पेठ,
छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, महात्मा ज्योतिबा फुले पुतळा, आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळ्यास अभिवादन करून पुढे रामलाल चौक मार्गे सरस्वती चौकातून राजमाता अहिल्यादेवी होळकर व चार हुतात्मे यांच्या पुतळ्यास अभिवादन करून पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास अभिवादन करून सिद्धेश्वर मंदिराशेजारी शहाजोरी अली दर्गाह येथे समारोप होणार आहे.
रात्री सात वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान समोर न्यू बुधवार पेठ येथे संविधान बचाव यात्रेची जाहीर सभा होणार असून या सभेला राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर मार्गदर्शन करणार आहेत. तरी सोलापूर शहर जिल्ह्यातील संविधान प्रेमींनी या संविधान बचाव रॅलीत आणि जाहीर सभेस उपस्थित राहावे. असे आवाहन रिपब्लिकन सेनेच्या वतीने करण्यात आलं आहे.
या पत्रकार परिषदेस सिद्धार्थ कांबळे, रजनीकांत गायकवाड, राम रणसुरे, वसीम पठाण, आणि बाळासाहेब मसलखांब आदी उपस्थित होते.
0 Comments