माढा तालुक्यात दोनच दिवसात सापडल्या ३ हजार ४८५ मराठा कुणबी च्या नोंदी
माढा (कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्रातील मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्राचे दाखले मिळावे यासाठी मनोज जरंगे पाटील यांच्या आंदोलनानंतर महाराष्ट्र सरकारने जरांगे पाटील यांना आश्वासित केल्यानुसार कुणबी नोंदी शोधण्याचे काम तालुका स्तरावर हाती घेण्यात आले आहे. माढा तालुक्यात मागील २ दिवसांपासून कुणबी दाखले शोधण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून तहसील कार्यालया अंतर्गत जन्ममृत्यूच्या रजिस्टर मध्ये 1 लाख ५ हजार १०४ नोंदी तपासण्यात आल्या असुन या मध्ये कुणबी मराठा नोंदी ३ हजार ४८५ इतक्या आढळल्या आहेत. शालेय स्तरावरील तसेच इतर ठिकाणी शासकीय दस्तऐवजात मोठ्या प्रमाणात कुणबी नोंदी आढळून येत असून कुणबी मराठा एकच असून पुराव्यांचा हा आकडा देखील तपासणीत आणखी वाढणार असुन प्रमाण पत्र शोधण्याची गती प्रशासनाने वाढवण्याची मागणी सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली आहे.
0 Comments