Hot Posts

6/recent/ticker-posts

सोलापूर होटगी रोड वरून विमानसेवा सुरू होण्यास २०२४ उजाडणार-विमानतळ प्राधिकरणाची खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी ही आडमुठी भूमिका कारणीभूत. - डॉ. संदीप आडके

 सोलापूर होटगी रोड वरून विमानसेवा सुरू होण्यास २०२४ उजाडणार-विमानतळ प्राधिकरणाची  खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी ही आडमुठी भूमिका कारणीभूत. - डॉ. संदीप आडके



सोलापूर विचार मंचच्या डॉ.आडके यांनी थेट गाठले एअरपोर्ट अथोरिटी ऑफ इंडियाचे दिल्लीतील मुख्यालय!

सोलापूर(कटूसत्य वृत्त):- नुकतेच एअरपोर्ट अथोरिटी ऑफ इंडिया मुख्यालय, नवी दिल्ली येथे मी भेट देऊन सोलापूर होटगी रोड विमानतळ चालू करण्याबाबत विचारणा केली असता जोपर्यंत विमानतळावरील सर्व कामे पूर्णत्वास येणार नाहीत तोपर्यंत डीजीसीए लायसन्स देणार नाही व येथून विमानसेवा सुरू होऊ शकणार नाही. सध्या विमानतळावरील सर्वच कामांचे टेंडर देऊन कामांची सुरुवात झालेली आहे परंतु ही सर्व कामे संपण्यास २०२४ उजाडेल असे संकेत मुख्यालयातून मला प्राप्त झाले आहे असे डॉ. संदीप आडके यांनी सांगितले. होटगी रोड विमानतळातील प्रमुख अडथळा असलेली सिद्धेश्वर कारखान्याची बेकायदा चिमणी पाडून आज पाच महिने होत आहेत परंतु प्रशासनातील भोंगळ कारभार येथील लोकप्रतिनिधींची सोलापूरच्या प्रगती विषयीची अनास्था व मुख्य म्हणजे सोलापुरातील मूग गिळून गप्प बसणारी जनता ही त्याच्या मागची प्रमुख कारणे आहेत. सोलापूर विचार मंचतर्फे गेली चार वर्षे विमानतळ सुरू करण्याबाबत सर्व स्तरावर आम्ही लढा देऊन केवळ प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे होटगी रोड विमानतळावरून विमानसेवा सुरू होत नाही. कमीत कमी २०२३ अखेरपर्यंत विमानतळावरील महत्त्वाची कामे करून सोलापूर ते मुंबई व हैदराबाद अशी विमानसेवा सुरू करण्याचा डॉ.संदीप आडके यांनी सोलापूर विचार मंच द्वारे वारंवार आग्रह करून सुद्धा एअरपोर्ट अथोरिटी ऑफ इंडिया, डीजीसीए ,नागरी उद्ययन मंत्रालय व पंतप्रधान कार्यालयाकडून ही कामे पूर्वीच करून विमानतळ सुरू करता आले नाही ही सोलापूरच्या प्रगतीच्या दृष्टीने अत्यंत लाजिरवाणी बाब आहे.
२.१ किलोमीटर धावपट्टीचे रीकारपेटिंग ,कंपाउंड वॉल, पाणी, ड्रेनेज, अग्निशमन यंत्रणा, पार्किंग व इमारतीमधील इतर सोयी अशा सर्व बाबी प्रलंबित आहेत. या सर्व गोष्टी गेल्या चार-पाच महिन्यामध्ये पूर्ण करून आज सोलापुरातून विमानसेवा सुरू झाली असती परंतु येथील लोकप्रतिनिधींना याबाबतीत कोणतेच गांभीर्य नाही तसेच विमानतळ सल्लागार समिती खासदारांच्या अध्यक्षतेखाली काहीच काम करत नाही व या उलट सातत्याने मीडियामध्ये खोट्या बातम्या पसरवल्या जात आहेत. वरील सर्व कामे ही केंद्रीय पातळीवर होणारी आहेत परंतु जिल्हाधिकाऱ्यांकडे बैठक होऊन या कामाबाबतीत विमानतळ लवकरच सुरू होईल अशा चुकीच्या बातम्या पसरवल्या जात आहेत यामुळे सर्व सोलापूरकरांची दिशाभूल केली जात आहे. एकंदर सोलापूर होटगी रोड विमान सेवा सुरू होण्यास आता २०२४ साल उजाडणार हे मात्र नक्की व या संपूर्ण अकार्यक्षम प्रशासनामुळे विमानसेवेची आतुरतेने प्रतीक्षा करणाऱ्या सर्व सोलापूरकरांच्या पदरी २०२३ मध्ये निराशाच पडली आहे.
Reactions

Post a Comment

0 Comments