काव्यमय गोष्ट
मूर्ख गाढव चतुर कोल्हा
धोब्याकडे होते,गाढव कामास
त्याला नसे मुभा,दिवसा खाण्यास
दिनभर काम,गाढव ते करी
रात्री खाई पिके,पहाटेस घरी
दिनक्रम रोज,असे त्याचा चाले
भेटला कोल्होबा,दोघे मित्र झाले
भेट होता त्यांची,पौर्णिमेच्या रात्री
गाढवास पटे,मैत्रीची हो खात्री
गाढव म्हणाले,गाऊ का? मी गाणे
कोल्हा त्यास म्हणे,नको ओरडणे
कोल्हा होता धूर्त,केली त्याने शाळा
गाण्याच्या पूर्वीच,ओलांडला मळा
मूर्ख ते गाढव,शब्द गाता चार
मालकाने त्यास,दिला खूप मार
गाढवाची थांबे,जेंव्हा वळवळ
गळ्यात बांधले,दगडी उखळ
शुद्ध येता हळू,कणत निघाले
कोल्ह्याने रस्त्यात,त्याला अडवले
तुमचे ते गाणे,म्हणे छान झाले
बक्षिस पदक,गळ्यामध्ये आले
टोचून बोलणे,लक्षात हो आले
मूर्ख ते गाढव,निघून हो गेले
.युवराज गोवर्धन जगताप
काटेगाव ता :- बार्शी
जिल्हा:-सोलापूर
8275171227
0 Comments