Hot Posts

6/recent/ticker-posts

पंढरीच्या सुपुत्राच्या कृषी क्षेत्रातील कामगिरीची देशपातळीवर दखल

 पंढरीच्या सुपुत्राच्या कृषी क्षेत्रातील कामगिरीची देशपातळीवर दखल

 युवा उद्योजक दिपक बनसोडे यांचा भारत बिजनेस अवार्डने गौरव



पंढरपूर(कटूसत्य वृत्त):- शहरातील इसबावी येथील दिपक बळीराम बनसोडे यांना देशपातळीवरील मानाचा समजला जाणाऱ्या भारत बिजनेस अवार्ड 2023 ने सन्मानित करण्यात आले आहे. मुंबई येथील भारतरत्न गाण गाणंसम्राज्ञी लता मंगेशकर सभागृहात नुकत्याच पार पडलेल्या न्यूज इंडिया लाईव्हच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात दिपक बनसोडे यांना प्रसिद्ध सिनेअभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. 

कृषी क्षेत्रात व कृषी औद्योगिकी क्षेत्रात करण्यात येणाऱ्या अतुलनीय कामगिरी करणाऱ्यांना हा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो.दिपक बनसोडे हे कृषी क्षेत्रातील नावीन्यपूर्वी घडामोडी आणि प्रयोग या बाबत सदैव जागरूक राहून आपल्या कृषी सेवा केंद्राच्या माध्यमातून कार्यरत राहिले आहेत.त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना राज्यस्तरीय डॉ.पंजाबराव देशमुख कृषी रत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते. .

दिपक बनसोडे हे कृषी पदवीधर असून रत्नाई कृषी महाविद्यालय येथे त्यांनी पदवी प्राप्त केली आहे.पुढे राष्ट्रीय कृषी योजनेअंतर्गत डाळिंब पिकावरील कीड व रोग सर्वेक्षण सल्ला व व्यवस्थापन प्रकल्प या योजनेअंतर्गत राष्ट्रीय डाळींब संशोधन केंद्र व महात्मा फुले विद्यापीठ राहुरी यांच्या संयुक्त विद्यमानाने महाराष्ट्र शासन कृषी विभाग येथे कीड सर्वेक्षक म्हणून उल्लेखनीय काम केले तसेच प्लास्टिक कल्चर टेक्निकल टेक्निक नवी दिल्ली व ग्री क्लिनिक अँड ग्री बिजनेस मॅनेजमेंट हैद्राबाद येथे त्यांचे ट्रेनिंग पूर्ण केले शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या पिकाविषयी असणाऱ्या कीड व रोगाविषयी अडचणी सोडवण्याचे काम देखील केले.पुढे त्यांची सन 2017 मध्ये जर्मन येथील एग्रीकल्चर टेरिटरी मॅनेजर म्हणून निवड झाली त्यांच्या अकरा वर्षाच्या प्रात्यक्षिक ज्ञानाचा तसेच कृषी शिक्षणाच्या आधारे 2021 मध्ये त्यांनी स्वतःचे कृषी सेवा केंद्र सुरू करून स्वतःचा एग्री कन्सल्ट हा व्यवसाय सुरू केला यातून शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना मोफत सल्ला देण्याचे काम देखील अविरत सुरूच आहे त्यांनी शेतकऱ्यांना योग्य माहिती व टेक्निकली नॉलेज दिल्याने शेतकऱ्यांचे नुकसान कमी होऊन पिकांचे उत्पन्न वाढल्याने त्यांच्याविषयी शेतकऱ्यांमध्ये आदराचे स्थान निर्माण झाले आहे. दिपक बनसोडे यांच्या अतुलनीय कार्याबद्दल व पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन व शुभेच्छाचा वर्षाव केला जात आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments