शिवरत्न नाॅलेजसिटी येथे संविधान दिवस उत्साहात साजरा
अकलूज (कटूसत्य वृत्त):- शिवरत्न नाॅलेज सिटी येथील शिवरत्न शिक्षण संस्था संचलित विजयसिंह मोहिते-पाटील नर्सिंग काॅलेज,शिवरत्न इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, ग्रीनफिंगर्स काॅलेज ऑफ कॉम्प्युटर & टेक्नालॉजी या महाविद्यालयांमध्ये उद्देशिका वाचन, व्याख्यान आदी विविध कार्यक्रमांचे आयोजन करून संविधान दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून दिग्दर्शक व युवा भारूडकार नागनाथ साळवे उपस्थित होते.विविध धर्म,प्रांत, संप्रदाय, भाषा,रूढी पंरपरा असतानाही, सर्वांमध्ये एकात्मता उत्पन्न करणारे असे देशाचे संविधान आहे. या संविधानाने आपल्या देशात अद्वितीयरितीने लोकशाही व्यवस्था दृढमूल केली आहे., म्हणून त्याचे आपल्या जीवनात महत्व आहे. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या उत्तुंग प्रतिभेची ते साक्ष आहे, असे नागनाथ साळवे यांनी विद्यार्थांना मार्गदर्शन करताना म्हणाले.
विजयसिंह मोहिते-पाटील नर्सिंग महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांकडून शंकरनगर येथे संविधान जनजागृती रॅली काढण्यात आली तर शिवरत्न इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज व ग्रीनफिंगर्स काॅलेजच्या विद्यार्थीनी उद्देशिकेचे वाचन केले
यावेळेस कार्यक्रमास प्राचार्य मेरी सुमती, प्राचार्य अरविंद कुंभार,चैत्रालि पिसे,सविता उप्पल्ली,शिवतीर्थ हिरेमठ,भारत साठे,नितीन कंगळे,अमोल खरात,रंजना कांबळे,वसिम सय्यद व इतर मान्यवर उपस्थित होते.
0 Comments