माढ्यात बहिण भावाच्या प्रेमाची प्रचिती,शेतकरी भावाने केला बहिणीचा सन्मान सोहळा
माढा (कटूसत्य वृत्त):- सध्याच्या हायटेक जमान्यात एकीकडे संपत्ती साठी बहिण भावाच्या नात्यात जागा जमिनीच्या वाटणीवरुन पैश्यासाठी कोर्ट कचेरी भांडणाचे वादंग घडताना दिसतात . दुसरीकडे मात्र सोलापूर च्या माढा शहरात बहिण भावाच्या प्रेमाची प्रचिती दिसुन आली असुन दोघा भावंडानी आपल्या बहिणीचा सन्मान सोहळा करुन बहिणीचे नाते आधोरेखीत केले आहे.माढ्यातील सौदागर वाकावकर व औदुंबर वाकावकर या भावंडानी दमयंती वाकावकर या बहिणीचा सन्मान सोहळा साजरा केला.भावाने बहिणीचा साजरा केलेल्या सन्मान सोहळ्याची सर्वत्र चर्चा होताना पहायला मिळत असुन माढेकरांनी देखील या सोहळ्याचे कौतुक करुन कृतज्ञता व्यक्त केली.
0 Comments