राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र व सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीस लोकमंगलच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक भेट
सोलापूर (कटुसत्य वृत्त): ग्रामीण संशोधन व विकास प्रतिष्ठान, वडाळा संचलित लोकमंगल कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातर्फे द्वितीय व तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात आले होते. या शैक्षणिक भेटीमध्ये विद्यार्थ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर येथील फळे, फुले , भाजीपाला ,कांदा व गुळ यासारख्या विविध बाजारपेठांना भेट देऊन तेथील शेतमाल साठवण्याच्या व विक्रीच्या विविध पद्धती याविषयी बाजार समिती सोलापूरचे सहाय्यक सचिव डी. एस. सूर्यवंशी तसेच समितीतील हमाल, दलाल, व्यापारी यांच्याशी प्रत्यक्ष भेट देऊन माहिती संपादित केली. कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूरचे सहाय्यक सचिव डी. एस. सूर्यवंशी यांनी विद्यार्थ्यांचे चर्चासत्र आयोजीत करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. याचबरोबर विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र व कृषी विज्ञान केंद्र या सोलापूर येथील कृषी संशोधन संस्थांना भेट दिली. या भेटीत विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्रातील ऊती संवर्धन, जैवतंत्रज्ञान, जैवरासायनशास्त्र, उद्यानविद्या, अन्नप्रक्रियाशास्त्र आदी प्रयोगशाळांमध्ये भेट देऊन तेथील प्रगत तंत्रज्ञानाची माहिती घेतली. राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र येथे वरिष्ठ संशोधक डॉ. सोमनाभ पोखरे, अमर कदम, अजिंक्य मांडवे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ही शैक्षणिक सहल यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रदीप आदलिंगे, प्रा. सागर महाजन व प्रा. प्रवीण शेळके यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
0 Comments