आय ई आय सोलापूरतर्फे विविध अभियंत्यांचा प्रतिभावान सदस्य म्हणून सन्मान
सोलापूर (कटुसत्य वृत्त): नुकत्याच पार पाडलेल्या चौदाव्या आयईआयच्या सर्वसाधारण सभेत विविध इंजिनिअरचा प्रतिभावान सदस्य म्हणून सन्मान करण्यात आला. क्रीडा ही संस्थेच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल इंजी.सुनील फुरडे, पाणीपुरवठा संदर्भात केलेल्या कामगिरीबद्दल इंजि. संजय धनशेट्टी, इंजिनिअरिंग क्षेत्रात शैक्षणिक उत्कृष्ठतेबददल स्वेरी कॉलेजचे पंढरपूर प्राचार्य इंजिनीयर डॉक्टर प्रशांत पवार, इंजिनिअरिंग क्षेत्रातील शोध प्रकल्पाबद्दल ऑर्किड कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर वी.के. सोनगे , शेती विषयक संशोधन प्रकल्प बद्दल इंजिनीयर सुहास उपाध्ये, प्रदीर्घ व उत्कृष्ट प्रशासनाबद्दल वी वी पी पॉलिटेक्निकचे प्राचार्य एस एम शेख यांना आय ई आयचे प्रतिभावान सदस्य म्हणून विशेष मानपत्र व मेडल ने सन्मानित करण्यात आले. सभेच्या प्रारंभी इंजिनीयर रोंगे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. स्वागत व अध्यक्ष भाषण एसएम शेख यांनी केले तर इंजि. मोहन देशपांडे यांनी वर्षभरात केलेल्या कामकाजाचे सादरीकरण केले तर प्राचार्य मुगळे यांनी आभार प्रदर्शन केले. तसेच इंजिनिअरिंग क्षेत्रातील प्रदीर्घ सेवेतून निवृत्त झालेल्या इंजिनीयर प्रा. एस.वी. नाईक, इंजि. प्रा. डॉ. व्ही व्ही पोतदार, इंजी. प्रा. डॉ. एस. एन. कुलकर्णी, इंजी. प्रा. जी.पी. जैन, इंजी. प्रा. पी. एस. भोपळे, यांचा शाल स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी आय ई आयचे अध्यक्ष इंजि. एच.एन. सोमाणी, संस्थापक सचिव इंजि. डॉ. जी. के. देशमुख आदी उपस्थित होते.

0 Comments