रामदास आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त मोहोळ येथे सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन
मोहोळ (कटूसत्य वृत्त):- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त सालाबाद प्रमाणे याही वर्षी सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन नालंदा बहुउद्देशीय सामाजिक संस्था मलिकपेठ यांच्यावतीने ३१ डिसेंबर २०२३ रोजी करण्यात आले असल्याची माहिती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष हनुमंत कसबे यांनी दिली. हे विवाह सोहळ्याचे नवे वर्ष असून विवाह सोहळा सर्वधर्मानुसार लावण्यात येतो विवाह साहळ्यामध्ये वधू-वरांना सर्व संसार उपयोगी साहित्य भांडी ठेवण्यासाठी रॅक, वधुला मणीमंगळसूत्र, जोडवी, विधीची साडी वराला विधीचा ड्रेस संस्थेच्या वतीने दिले जाते येणाऱ्या वऱ्हाडांची जेवणाची अतिशय उत्तम व्यवस्था संस्थेच्या वतीने केली जाते. संस्थेच्या वतीने आत्तापर्यंत सर्वधर्मानुसार ८० ते १०० विवाह लावून दिले आहेत. इच्छुक लावून दिले आहेत लावून दिले आहेत वधू-वरांनी आपली नांव नोंदणी १५ डिसेंबर पर्यंत चंद्रमणी ड्रायव्हिंग स्कूल बँक ऑफ इंडिया शेजारी मोहोळ तसेच ९१९६३७७७३१९४, ९९२२७६ ६४३४, ७७०९५९३९९१ फोन करून आपली नाव नोंदणी करून घ्यावी असे आवाहन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष तथा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष हनुमंत कसबे यांनी केले आहे.
0 Comments