Hot Posts

6/recent/ticker-posts

पाॅक्सो कायद्याअंतर्गत गंभीर गुन्ह्यातील आरोपीस बार्शी न्यायालयातून जामीन मंजूर*

पाॅक्स कायद्याअंतर्गत गंभीर गुन्ह्यातील आरोपीस बार्शी न्यायालयातून जामीन मंजूर*



 बार्शी (कटूसत्य वृत्त):- अतिरिक्त व सत्र न्यायालयाने पाॅक्सो सारख्या गंभीर गुन्ह्यातील 2 महिन्यांपासून अटकेत असणाऱ्या आरोपी अमोल धनराज तरमुडे यास जामीन मंजूर केला आहे.

याप्रकरणी थोडक्यात हकिकत अशी की माढा तालुक्यातील 
मौजे तुळशी येथील रहिवासी असणार्या पिडीत मुलीच्या वडीलांनी टेंभुर्णी पोलिस स्टेशन मधील दिनांक 5 सप्टेंबर 2023 रोजीच्या तक्रारीवरून गुन्हा रजिस्टर नंबर 586/2023 नुसार  
भारतीय दंड संहितेच्या कलम ३६३ अंतर्गत अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. तद्नंतर दिनांक 10 सप्टेंबर रोजी सदर गुन्ह्यातील पिडीत निर्भया (नाव बदललेले) व आरोपीस अमोल धनराज तरमुडे हे टेंभुर्णी पोलीसांत हजर झाले असता टेंभुर्णी पोलीसांनी आरोपी अमोल तरमुडे व त्याचा साथीदार दादा मुलाणी यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 366, 34 आणि बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 12 अंतर्गत कलम वाढ करत अटक केली. यानंतर सदर गुन्ह्यातील मुख्य आरोपी अमोल धनराज तरमुडे याच्या कुटुंबियांनी अ‍ॅड.अजिंक्य संगीतराव यांच्यामार्फत बार्शी न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला. तद्नंतर पिडीत तरुणी व आरोपी या दोघांमध्ये प्रेमसंबंध होते व प्रथमदर्शनी वैद्यकीय तपासातून पिडीत तरुणीच्या शरीरावरती कोणत्याच प्रकारच्या जखमा दिसून येत नाहीत व आरोपी व  पिडीत तरुणी यांच्यामधे कोणत्याही प्रकारचा शारिरीक संबंध झालेला नाही 
असा आरोपीचे वकील ADV.अजिंक्य संगीतराव यांनी युक्तिवाद केला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर सन्माननीय न्यायालयाने दिनांक 7 नोव्हेंबर 2023 रोजी रुपये 50000 इतक्या जातमुचलक्यावरती व काही अटी शर्तीनुसार आरोपीचा जामीन अर्ज मंजूर करण्यात आला. याप्रकरणी आरोपीच्या वतीने अ‍ॅड. दयानंद पाटील आणि अ‍ॅड.अजिंक्य संगीतराव यांनी काम पाहिले.
Reactions

Post a Comment

0 Comments