Hot Posts

6/recent/ticker-posts

नवीन बस गाड्यांबाबत कळंब आगाराला ठेंगा कर्मचाऱ्यासह प्रवाशातून तीव्र संताप लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष अधिकाऱ्याचे मात्र कानावर हात

 नवीन बस गाड्यांबाबत कळंब आगाराला ठेंगा कर्मचाऱ्यासह प्रवाशातून तीव्र संताप लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष अधिकाऱ्याचे मात्र कानावर हात 



कळंब (कटूसत्य वृत्त):- बस आगारात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या धाराशिव विभागाला नुकत्याच नवीन ३९  बस प्राप्त झाल्या पण कळंब  आगाराला मात्र वरिष्ठाकडून वाटपात ठेंगाच दाखवण्यात आला आहे .  यामुळे कर्मचाऱ्यासह प्रवाशात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे . याकडे लोकप्रतिनिधी लक्ष देण्याची गरज आहे . याबाबत अधिकार्‍याशी संपर्क साधा असता त्यांचे  चक्क कानावर हात ठेवले जात आहेत .  हा असाच प्रकार चालत राहिला तर काही दिवसात बहुतांश फेऱ्यासह आगार बंद करण्याची वेळ महामंडळावर येऊ शकते . धाराशिव विभागात  सर्वत्र जास्त उत्पन्नाचा बस आगार पण केवळ बसविना कळंब  आगारात अवकाळात आली आहे .  अनेक खुळखुळा झालेल्या बस गाड्या लांब पल्ल्याच्या मार्गावर धावत आहेत .  यात प्रवास करताना प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे .  कळंब आगारात दैनंदिन फेऱ्या ह्या जवळपास ८० च्या आसपास आहेत तर कळंब आगारात सध्या ७१ बस गाड्या आहेत या सर्व फेऱ्यासाठी जवळपास ८० बस गाड्यांची आवश्यकता असते परंतु बस गाड्या उपलब्ध नसल्यामुळे अनेक वाहक चालकांना रोजगार मिळत नाही , तर रोजगारासाठी अधिकाऱ्यांची व कर्मचाऱ्यांत  रोजच खटके उडतात . धाराशिव विभगाने कळंब आगारा ला  दोन स्लीपर कोच बस मागील चार दिवसांपूर्वी दिल्या होत्या पण त्या दोन बस ही परत घेतल्या धाराशिव विभागातील उमरगा , भूम ,तुळजापूर आशा आगारांनाच प्राधान्य दिले जाते मग कळंब आगारानेच काय घोडं मारले का असा प्रश्न प्रवाशातून विचारला जात आहे .  त्यामुळे कर्मचाऱ्यातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे अशा या कुचकामी वृत्तीला काय म्हणावे जर नवीन बस गाड्या उपलब्ध झाल्या तर बोरवली , मुंबई , पुणे , संभाजीनगर, नांदेड , जालना , हुमनाबाद अशा यालांब पल्ल्याच्या  मार्गावर या नवीन बस चालतील त्यामुळे उत्पन्नातही मोठी वाढ होईल अशी अपेक्षा प्रवाशातून व्यक्त केली जात आहे . पण अधिकाऱ्यांच्या  व लोकप्रतिनिधीच्या दुर्लक्षामुळे हा सर्व प्रकार घडत असल्यामुळे कळंब  आगाराला येणाऱ्या काळात नवीन बस मिळतील का नाही यात शंका व्यक्त केली जात आहे . कळंब आगाराला तात्काळ नवीन बस उपलब्ध करून द्याव्यात न दिल्यास प्रवासी मित्र संघटनेमार्फत डेपो पुढे धरणे आंदोलन सुरू करण्यात येईल असा इशाराही प्रवासी मित्र संघटनेने दिला आहे . 

Reactions

Post a Comment

0 Comments