Hot Posts

6/recent/ticker-posts

माळशिरस तालुक्यातील ग्रामीण रस्ते व पुलासाठी 2 कोटींचा निधी मंजूर

 माळशिरस तालुक्यातील  ग्रामीण रस्ते व पुलासाठी 2 कोटींचा निधी मंजूर



आ राम सातपुते यांच्या पाठपुराव्याला यश

माळशिरस (कटूसत्य वृत्त):-  तालुक्यातील  ग्रामीण भागातील  रस्ते व पुलासाठी  आ राम सातपुते यांनी  राज्याचे माजी  उपमुख्यमंत्री  विजयसिंह मोहीते पाटील  व आ रणजितसिंह मोहीते पाटील  यांच्या  मार्गदशनाखाली  तालुक्यातील  ग्रामीण भागातील  रस्ते  व पुलासाठी  ग्रामविकास मंत्री  गिरीशजी महाजन  यांच्याकडे  निधीची मागणी  केली  होती यासाठी  2 कोटी रुपयांचा निधी  उपलब्ध  करुन  दिल्याने  माळशिरस तालुक्यातील  जनतेतुन  समाधान  व्यक्त  केले जात आहे. 


     माळशिरस तालुक्यातील  विविध  विकासकामांना  आ राम सातपुते  राज्य  सरकारकडुन भरीव निधी उपलब्ध  करुन  देणयासाठी  प्रयत्नशील  असतात  ग्रामीण भागातील  रस्त्यांना  व पुलासाठी  2 कोटी रुपयांचा  निधी  उपलब्ध  करुन  दिला आहे  यामध्ये ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे  क गटातुन  ग्रा मा ४१ ते तुपेवस्ती मळोली ग्रा मा ३९० रस्ता  करणे ३० लाख,झिंजेवस्ती  खोरेवाडी ग्रा मा ३९३ रस्ता  करणे  ३० लाख रुपये, फडतरी निटवेवाडी ते ठोंबरेवाडी ग्रा मा ४५७ पुल बांधणे २० लाख रुपये, ग्रा मा ३७९ खंडाळी फाटा ते चौडेशरवाडी ग्रा मा ३५९ पुल बांधणे  १५ लाख रुपये, सुळेवाडी  ते पठाणवस्ती  ग्रा मा ५० पूल बांधणे ५ लाख रुपये   तर याव्यतिरिक्त  ब गटातुन तोंडले धानोरे प्रा मा २१३ रस्ता  करणे  ५०  लाख  रुपये, माळीनगर  येथील  प्रा मा २३९ ते महाळुंग चौकी रस्ता करणे ३० लाख रुपये,  रा मा २१२ ते मिटकलवस्ती प्रा मा २७६ रस्ता  करणे  २० लाख रुपये   अशी  ग्रामीण भागातील  रस्ते  व पुलासाठी  आ राम सातपुते  यांनी  निधी उपलब्ध  करुन  दिल्याने ग्रामीण  भागातील  सर्वसामान्य  जनतेतून समाधान  व्यक्त  केले जात आहे

Reactions

Post a Comment

0 Comments