अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने घोडे बाजाराचे आयोजन
"माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न"
अकलूज:(कटूसत्य वृत्त):- अकलूज येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने भव्य घोडे बाजार आयोजित केला असून या बाजाराचे उद्घाटन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते व सहकार महर्षी साखर कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते पाटील यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले . त्याप्रसंगी आयोजित समारंभात आ पवार यांनी पंढरपूर येथे मोहिते पाटील यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याचा आ सातपुते यांनी समाचार घेतला .
प्रारंभी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते पाटील यांनी बाजार समितीच्या कामाचा आढावा घेवून सन २००९ पासून अकलूज येथे घोडे बाजार भरविण्यात येत असून या बाजारामुळे कोट्यावधी रुपयांची उलाढाल होत असल्याचे सांगितले .
सचिव राजेंद्र काकडे यांनी उद्घाघटनापुर्वीच सव्वा कोटीची उलाढाल झाली असल्याचे सांगून यावर्षी पाच कोटीची उलाढाल अपेक्षीत असल्याचे सांगितले .
अकलूज घोडे बाजारामुळे सर्व सामान्य व्यक्तीपासून ते मोठ्या व्यापाऱ्यांपर्यंत व्यवसाय वाढला , चलनवाढ झाली . लॉजिंग , हॉटेल , लहानमोठे व्यापारी , शेतकरी यांना चांगला व्यवसाय मिळाल्याचे सांगून धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले ,
घोडेस्वारी म्हणजे एक क्रीडा प्रकार आहे . मुल घोडेस्वारी करु शकतात . शेतकऱ्यांनी घोडे घेवून केवळ वरातीत नाचवू नका . घरोघर खेळाडू निर्माण करा . त्यांना क्रीडा क्षेत्रात आणा .
या उद्घाटन समारंभास आ रणजितसिंह मोहिते पाटील , उपसभापती मामासाहेब पांढरे , ॲड प्रकाश पाटील , दत्तात्रय भिलारे , रामचंद्र सावंत पाटील , प्रताप पाटील , रावसाहेब पराडे यांच्यासह बाजार समितीचे संचालक , विविध संस्थाचे पदाधिकारी व घोडे व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते . लक्ष्मण पवार यांनी आभार मानले .

0 Comments