Hot Posts

6/recent/ticker-posts

शंकरराव मोहिते महाविद्यालयात वृक्षदिंडी सोहळा संपन्न

 शंकरराव मोहिते महाविद्यालयात वृक्षदिंडी सोहळा संपन्न


अकलूज (कटूसत्य वृत्त):- शंकरराव मोहिते महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या कार्यप्रसिद्धी सप्ताहाअंतर्गत वृक्षदिंडी व वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .यावेळी विद्यार्थ्यांनी वृक्ष संवर्धनासाठी जनजागृती करणाऱ्या घोषणा दिल्या. टाळ मृदंगाच्या निनादात महाविद्यालय परिसरातून ही वृक्षदिंडी काढण्यात आली. खाशाबा जाधव इनडोअर स्टेडियम जवळ या दिंडीचा समारोप होऊन त्यानंतर वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला . यावेळी या वृक्षदिंडीमध्ये स्वयंसेवकाबरोबर महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. विश्वनाथ आवड, डॉ. बाळासाहेब मुळीक व डॉ. जनार्दन परकाळे सहभागी झाले होते.  या कार्यक्रमात 150 स्वयंसेवकानी सहभाग घेऊन सुमारे 100 रोपांची लागवड करण्यात आली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दत्तात्रय बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम अधिकारी डॉ. दत्तात्रय मगर डॉ. सज्जन पवार , प्रा. स्मिता पाटील व कार्यालयीन अधीक्षक युवराज मालुसरे यांनी परिश्रम घेतले.

Reactions

Post a Comment

0 Comments