विद्यार्थी पटसंख्या व उपस्थिती वाढावी विदयार्थींनींना शालेय साहित्याचे
वाटप गटविकास अधिकारी आनंदकुमार मिरगणे यांचा नाविन्यपूर्ण
अभिनव उपक्रम
मोहोळ (कटूसत्य वृत्त):-शिक्षण ही व्यक्तीची अंतर्निहित क्षमता आणि व्यक्तिमत्व विकसित करण्याची प्रक्रिया आहे ही प्रक्रिया विद्यार्थी विद्यार्थिनींना भविष्यात समाजापुढे प्रौढ व्यक्तीची भूमिका बजावण्यासाठी सरस राहणार असल्याचे प्रतिपादन गटविकास अधिकारी आनंदकुमार मिरगणे यांनी व्यक्त केले.
मोहोळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक डिजिटल शाळा नंबर चार येथे शालेय विद्यार्थी विद्यार्थिनींना जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढावी तसेच विद्यार्थ्यांची हजेरी शंभर टक्के राहावी याकरिता गटविकास अधिकारी या पदावर कार्यरत झाल्यानंतर शाळकरी विद्यार्थिनींना शालेय साहित्याचे वाटप करण्याचे ठरविले होते त्यानुसार शालेय साहित्य वाटप करण्यात आले त्याप्रसंगी ते बोलत होते .
याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रीती घाडगे, केंद्र प्रमुख सुरेश पवार, मुख्याध्यापक संजय महामुनी, बाळासाहेब कारंडे, हजरत शेख, महेश काटकर, सुनंदा हिलाले, अर्चना बदर, शमींमबानो खान, गोपाळ सितारे, अझरुद्दीन शेख, बंटी वस्त्रे, बापू रणदिवे सोलापूर जिल्हा बँड अम्बेसिडर राजन घाडगे आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना गटविकास अधिकारी आनंदकुमार मिरगणे म्हणाले की आपली आजची येणारी पिढी ही खऱ्या अर्थाने भारताचे भविष्य आहे आणि आज अनेक ग्रामीण भागात अर्थकारणामुळे अनेकांना आपले शिक्षण अर्ध्यात थांबवावं लागत आहे शिकण्यासाठी योग्य साधनाची पुर्ती नाही झाली की शिक्षण थांबवावं लागत आहे शाळकरी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपाच्या माध्यमातून एक छोटासा प्रयत्न केल्याचे सांगितले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन गटविकास अधिकारी आनंदकुमार मिरगणे व अध्यक्ष प्रीती घाडगे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांचा सन्मान शाळेच्या वतीने करण्यात आला.
प्रायोगिक तत्वावर सुमारे 30 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले हा अभिनव उपक्रम जिल्हा परिषद शाळेमध्ये सुरू केल्याबद्दल शाळेच्या अध्यक्षा प्रीती घाडगे यांनीही भरभरून प्रशंसा केली. यावेळी शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोपाळ सितारे यांनी केले तर शेवटी आभार बाळासाहेब कारंडे यांनी व्यक्त केले.

0 Comments