१५ जून रोजी चिमणी पडल्यानंतर फक्त दोन आठवड्याच्या आत रनवेची दुरुस्ती करून येथून विमानसेवा सुरू करणे शक्य असताना देखील सर्व संबंधित खात्यांनी तसेच स्थानिक प्रशासन व सोलापूर विमानतळ सल्लागार समितीने याबाबतीत कोणतेही गांभीर्य न पाळता अत्यंत मोलाचा वेळ गमावला आहे. एकदा येथून विमानसेवा सुरू झाल्यानंतर नाईट लँडिंग फॅसिलिटी ,कंपाउंड वॉल , इमारतीचे आधुनिकीकरण वगैरे इतर गोष्टी करता येण्यासारख्या होत्या परंतु सर्वच गोष्टींचे टेंडर काढण्यामध्ये हा साडेचार महिन्याचा कालावधी वाया घालवलेला आहे. विचार मंचतर्फे सुरुवातीला मुंबई ,नवी दिल्ली, बेंगलोर ,हैदराबाद व तिरुपती या ठिकाणी दररोजची नियमित विमानसेवा सुरू करा अशी मागणी करण्यात आली होती व त्याबाबतीत डॉ. संदीप आडके यांनी स्वतः पुढाकार घेऊन आठ विमान कंपन्यांना पत्र व्यवहार केला असता त्यातील फ्लाय बिग, स्टार एयर व इंडिगो या कंपन्यांनी २४ तासाच्या आत अशी सेवा सोलापुरातून देण्यासाठी उत्सुक असल्याबाबत त्यांना कळवले होते. सोलापूरच्या शेजारी असलेल्या कलबुर्गी, विजापूर ,शिर्डी, कोल्हापूर ,नाशिक अशा छोट्या छोट्या ठिकाणाहून आज विमान सेवा सुरू असून तेथून नव्या ठिकाणांसाठी विमानसेवा सुरू होत आहेत परंतु सोलापूर जिल्ह्याच्या ५० लाख लोकसंख्येसाठी व बाजूच्या लातूर धाराशिव जिल्ह्यांसाठी सोलापूर विचार मंचने तीन वर्षे लढा देऊन चिमणी पाड काम केले व कोणत्याही सरकारला न जमणारे काम करून दाखवले. 'उडान' योजनेतून तात्काळ विमान सेवा सुरू करणे गरजेचे असताना व त्याबाबत वारंवार पाठपुरावा करून सुद्धा सरकार पूर्णपणे अपयशी ठरलेले आहे. विमान सेवा नसल्यामुळे सोलापूरकरांचे व येथील उद्योगधंद्यांचे अतोनात हाल होत आहेत व सोलापूर झपाट्याने पिछाडीवर जात आहे. त्यामुळे येत्या आठ दिवसात डीजीसिएने सोलापूर विमानतळाची पाहणी करून तात्काळ परवाना देऊन येथून विमानसेवा सुरू करावी असा सज्जड इशारा विचार मंचच्या डॉ. संदीप आडके यांनी या पत्रातून दिलेला आहे.
.jpg)
0 Comments