Hot Posts

6/recent/ticker-posts

विठ्ठलवाडीच्या विठ्ठल वाचनालयात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी

 विठ्ठलवाडीच्या विठ्ठल वाचनालयात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी


माढा (कटूसत्य वृत्त):- माढा तालुक्यातील विठ्ठलवाडी येथील शासनमान्य 'ब' वर्गातील श्री विठ्ठल सार्वजनिक वाचनालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन सेवानिवृत्त बँक इन्स्पेक्टर नारायण खांडेकर व प्रगतशील शेतकरी अशोक गव्हाणे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य रामचंद्र भांगे यांनी सांगितले की,आजच्या पिढीने थोर महापुरुषांचे विचार व महान कार्याचा वारसा जतन केला पाहिजे.अधिकारी व पदाधिकारी यांनी भ्रष्टाचारापासून दूर राहून मनापासून सेवा बजावली पाहिजे तरच गोरगरीब व सर्वसामान्य जनतेला खरा न्याय मिळू शकतो. शालेय विद्यार्थ्यांनी दर्जेदार पुस्तके व साहित्य वाचून उच्च ध्येय प्राप्त करावे असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी सचिव नेताजी उबाळे यांनी सांगितले की, कोणत्याही सार्वजनिक संस्थेचे पदाधिकारी व कार्यकारी मंडळ जेंव्हा विविध सामाजिक व शैक्षणिक आणि सांस्कृतिक उपक्रम राबवितात तेंव्हाच ख-या अर्थाने ती संस्था समाजोपयोगी कार्य करीत आहे असे समजावे अन्यथा अनेक संस्थेत वर्षांनुवर्षे फक्त खुर्चीवर लोक बसलेले असतात परंतु कोणत्याही प्रकारचे उपक्रम राबविले जात नाहीत हे विदारक सामाजिक चित्र आहे. संस्थेच्या विकासासाठी पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी वेळ देऊन प्रयत्न केला पाहिजे असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी सेवानिवृत्त आदर्श मुख्याध्यापक बाळू गुंड,संचालक नेताजी कदम,आदर्श शिक्षक राजेंद्र गुंड,रामदास कोकाटे,पोपट खैरे,विठ्ठल बरकडे,ग्रामपंचायत सदस्य शिवाजी शेगर,नामदेव भुसारे,साहेबराव शेंडगे,शिवाजी जाधव, ग्रंथपाल अमोल जाधव,रवींद्र शेंडगे,अशोक कदम,अविनाश माने,विठ्ठल गाडे यांच्यासह ग्रामस्थ व वाचनालयाचे सभासद उपस्थित होते.
Reactions

Post a Comment

0 Comments