Hot Posts

6/recent/ticker-posts

अनैतिक संबंधातून खून प्रकरणी साक्षीदारांच्या साक्षीनंतर संशयित आरोपीची निर्दोष मुक्तता..

 अनैतिक संबंधातून खून प्रकरणी साक्षीदारांच्या साक्षीनंतर संशयित आरोपीची निर्दोष मुक्तता.....



           मोहोळ (कटूसत्य वृत्त):-तालुक्यातील इंचगाव येथील अनैतिक संबंधातून 12 नोव्हेंबर 2011 रोजी सोनाली डोके राहणार इंचगाव सदर महिलेचा पती सतत कामानिमित्त परगावी राहत असल्याचा फायदा घेत संशयित आरोपी नंबर एक सत्यवान सुनील डोके सदर संशयित आरोपी वडील सुनील डोके या दोघांवर 302 चा गुन्हा दाखल करण्यात आला होता सरकार पक्षातर्फे 25 साक्षीदारांच्या साक्षीनंतर निर्दोष मुक्तता करण्यात आली सदर फिर्यादीकडून सरकार पक्ष तर्फे ॲड. माधुरी देशपांडे यांनी काम पाहिले तर संशयित आरोपी तर्फे ॲड. राज पाटील, ॲड. शिवानंद खडके यांनी काम पाहिले.

                 सदरची हकीकत अशी की सोनाली डोके हिचे सतत पती परगावी राहत असल्याने सत्यवान डोके याच्याशी अनैतिक संबंध जुळून आले त्यानंतर  ते दोघे पती-पत्नी प्रमाणे राहू लागले काही काळानंतर पैशाच्या कारणावरून सतत त्या दोघांमध्ये वाद निर्माण होऊ लागले सत्यवान डोके हा पैसे देण्यासाठी टाळाटाळ करू लागला तसेच पती-पत्नी प्रमाणे राहण्यास नकार देऊ लागल्याने चिडलेल्या सोनाली डोके ह्या गावातील चौकामध्ये देखील त्याला भांडू लागल्याने गावात ना मुश्किल लागल्याने त्याचे लग्न जमण्यास अडचणी निर्माण होऊ लागल्या ने कायम सोनालीचा काटा काढण्याच्या हेतूने  मोटरसायकलवर कोथळे येथील फॉरेस्ट मध्ये नेऊन चाकूचा गळ्यावर पोटावर छातीवर वार करून तिचा जागीच खून करण्यात आला खून करण्याअगोदर ओढणीने हात पाय बांधून पोथ्यामध्ये घालून उजनी डावा कालवा मध्ये नेऊन पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने टाकून दिले. मेडिकल पुरावा व तोंडी पुरावा यामध्ये तफावत जाणून आल्याने संशयित आरोग्याची निर्दोष मुक्तता करण्यात आली आरोग्याच्या वतीने एडवोकेट राजकुमार पाटील एडवोकेट शिवानंद खडके यांनी काम पाहिले.

Reactions

Post a Comment

0 Comments