टेंभुर्णी ग्रामपंचायतची निवडणूक लावणारच....मयूर काळे*
*टेंभुर्णी नगरपंचायत तर व्हायलाच हवी परंतु जनसामान्यांच्या
विकासासाठी ग्रामपंचायत निवडणूक व्हायला हवी*
टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):- माढा तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून टेंभुर्णी ग्रामपंचायत ओळखली जाते तसेच सोलापूर- पुणे राष्ट्रीय महामार्गावरील अतिशय महत्वाचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टेंभुर्णी ग्रामपंचायत होऊ घातली असून निवडणुकीचा प्रोग्राम जाहीर झाला असुन अशातच सर्व राजकीय सत्ता हातात असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचा कुटे गट सत्ताधारी आणि विरोधक म्हणून भाजपाचे माढा तालुका अध्यक्ष योगेश बोबडे गट व तिसऱ्या आघाडी बबनदादा शिंदे यांना माननारे देशमुख गटाने ग्रामपंचायतला नगरपंचायतीचा दर्जा मिळेपर्यंत ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार घालण्याची भाषा करत आहेत अगोदरच गेले नऊ महिने या ग्रामपंचायतीवर प्रशासक असून प्रशासनाने लोकसंख्येच्या या ग्रामपंचायतीवर एक निष्क्रिय ग्रामसेवक ज्याचा आपल्या कर्मचाऱ्यावर ही होल्ड नाही जो पूर्णपणे राजकीय दबाव खाली काम करतो अशा ग्रामसेवकास प्रशासक म्हणून नेमले त्यामुळे पंचवीस तीस हजार लोकसंख्या असणाऱ्या या शहराच्या या आरोग्य स्वच्छता दिवाबत्ती यासारख्या समस्या सोडविण्यासाठी ही निवडणूक लढवणे गरजेचे आहे आणि तशी नागरिकांची इच्छा आहे . कारण राजकीय सर्व सत्ता हातात असताना तालुक्याचे आमदार आणि खासदार दोघे ही या ग्रामपंचायतीमधील प्रस्थापित सत्ताधारी व विरोधक दोघांच्या अतिशय जवळचे असताना आजपर्यंत नगरपंचायतीला मान्यता मिळवू शकले नाहीत त्यामुळे पुढे कधी मिळेल ते सांगता येत नाही अशा परिस्थितीत अगोदरच नऊ महिने पासून ग्रामपंचायत वर प्रशासक आहे . त्यामुळे जनतेची अनेक कामे खोळंबली आहेत . त्यासाठीच आम्ही शहरातील नागरिकांचा विचार घेऊन ही निवडणूक लावण्याचे ठरवले आहे . आणि नगरपंचायत तेंव्हा होईल तोपर्यंत शहराला वाऱ्यावर न सोडता शासनाच्या निधीचा योग्य विनीयोग करण्यासाठी ग्रामविकासासाठी निधी खेचून आणणारी सक्षम यंत्रणा असावी आज ही निवडणूक म्हणूनच ही निवडणूक होणे गरजेचे चे असल्याचे मत मयूर काळे यांनी टेंभुर्णी येथे घेतलेले पत्रकार परिषदेत सांगितले.
0 Comments