शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणारं... ! हेच का...? शेतकऱ्यांचे सरकार...!!
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- बऱ्याच महिन्याच्या प्रतीक्षेनंतर आलेला बळीराजा पुन्हा एकदा गावाला गेल्यामुळे शेतकरी राजा धास्तावला आहे. यंदा खरीप हंगाम पावसाअभावी कोरडा गेला. सर्व पिके करपून गेल्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा सुद्धा करपून गेल्या आहेत. पुन्हा पावसाने मोठा मेगा ब्लॉक घेतल्यामुळे रब्बीच्या पेरण्या होणार का...? असा प्रश्न शेतकऱ्यासमोर निर्माण झाला आहे. खरीप पिकाच्या आधारावर पिकाची आणेवारी जाहीर केली तर सरकारकडून दुष्काळाची घोषणा होऊ शकते. परंतु ऑनलाइन फॉर्म भरणे असे अनेक किचकट निकष सरकारने लादल्यामुळे येणाऱ्या काळात शेतकरी दुष्काळात होरपळून निघणार हे मात्र निश्चित...! शेतकरी राजाच्या जीवावर राज्य सत्ता आणि अर्थव्यवस्था चालू असताना सुद्धा हे सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून नुसतच हे शेतकऱ्यांचं सरकार असल्याचं बोलताना दिसत आहे. दुष्काळातील शेतकऱ्यांना आधार देण्याऐवजी सध्याचे राजकारण हे फक्त निवडणुका कशा जिंकता येतील. या भोवतीच फिरू लागले आहे. पिक विम्याची रक्कम आणि गेल्या वर्षीच्या संततधार पावसामुळे झालेल्या पिकाची भरपाई अद्याप पर्यंत शेतकऱ्याच्या खात्यावर न आल्यामुळे शेतकऱ्यांनी तीव्र असंतोष व्यक्त केला आहे. मराठवाड्यात पावसा अभावी खरीप पिकांचे नुकसान झाल्याने तेथील लोकप्रतिनिधी पाठपुरावा करून शेतकऱ्यांना पीक विमा कंपनीकडून भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत आहेत. महसूल प्रशासनाने पीक आणेवारी जाहीर केल्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरामध्ये सवलतीचे दान निश्चितपणे पडेल. अशी आशा असला तरी सोलापूर जिल्ह्यातील खरिपाचे प्रचंड मोठे नुकसान झाले असले तरी अद्याप पर्यंत येतील पिकांची आणेवारी महसूल प्रशासनाने जाहीर केलेली नाही. त्यामुळे पिक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना पिक विमा देण्याचा आदेश विमा कंपनीला सरकारच्या माध्यमातून देण्यात आला असला तरी कंपनी भरपाई देण्यास तयार नसल्याचे दिसत आहे. शिवा गेल्यावर्षी संत धार पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेले नाही .त्यामुळे "सरकारी काम आणि सहा महिने थांब" ही म्हण सध्या या राजकीय नेत्यांना लागू पडत आहे. पुरेशी ओल जमिनीत नसल्यामुळे खरिपाच्या पेरण्या कशातरी झाल्या परंतु आता रब्बीच्या पेरण्या कशा होणार ..? असा प्रश्न सध्या शेतकऱ्याला पडलेला आहे.
.jpg)
0 Comments