Hot Posts

6/recent/ticker-posts

होटगी रोड विमानतळ सुरु करण्यासाठी युद्धपातळीवर हालचाली

 होटगी रोड विमानतळ सुरु करण्यासाठी युद्धपातळीवर हालचाली


सोलापूर (कटूसत्य वृत्त):- केंद्र सरकारच्या 'उडान' योजनेअंतर्गत सोलापूर विमानतळावरील विमानसेवा डिसेंबरपासून सुरू व्हावी, यासाठी खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांचे प्रयत्न सुरु आहेत. त्यादृष्टीने त्यांनी विमानतळ प्राधिकरण समितीची बैठक घेऊन संबंधित अधिकाऱ्यांनी प्रलंबित कामे नोव्हेंबरअखेर पूर्ण करावीत, अशा सूचना केल्या. पण, प्रलंबित कामाची स्थिती पाहता नववर्षात सोलापूर विमानतळावरून 'उडान'अंतर्गत विमानसेवा शक्य होईल, असे चित्र आहे.

खासदार डॉ. महास्वामी यांच्या अध्यक्षतेखाली विमानतळ प्राधिकरण समितीची बैठक पार पडली. यावेळी समितीचे सदस्य विक्रम देशमुख, राजशेखर हत्ती, उद्योजक राम रेड्डी, डॉ. अग्रजा वरेरकर- चिटणीस आदी उपस्थित होते. विमानसेवा सुरु होण्यासाठी यापूर्वी १०, १४ जुलै, २३ ऑगस्ट व ६ सप्टेंबर रोजी बैठका पार पडल्या आहेत. 



Reactions

Post a Comment

0 Comments