Hot Posts

6/recent/ticker-posts

सोलापूर नव्हे हे तर खड्डापूर...!

 सोलापूर नव्हे हे तर खड्डापूर...! 


सोलापूर (दादासाहेब निळ):- स्मार्ट सिटीच्या यादीत सोलापूरचं नाव आलं. स्मार्ट सिटी चा ढोल वाजलं. भाजपाने सोलापूरचा चेहरा मोहरा बदलून टाकण्याचं सोलापूरकरांना वचन दिलं. आणि एक ठिकाणी खोदाई सुरू झाली.  परंतु स्मार्ट सिटीच्या नावाखाली सोलापूर शहराचं प्रचंड मोठ्या प्रमाणात विद्रूपीकरण झालं. हे भाजपाच्या नेत्यांनीच कबूल केलं.  या भाजपाच्या राजवटीमध्ये गेल्या पाच वर्षाच्या काळामध्ये भ्रष्ट गंगेचा महापूर शहरांमध्ये वाटतोय. या स्मार्ट सिटीच्या भ्रष्टाचारासाठी मातंग समाज रस्त्यावर उतरला आहे.  कारण अधिकारीच नेते आणि लोकप्रतिनिधी म्हणून ठेकेदार सुद्धा बनत आहेत.  या सोलापूरकरांना आणि सोलापूरकरांच्या समस्यांना महापालिकेमध्ये मांडणारा कोणीच वाली शिल्लक नसल्यामुळे सोलापूर शहराची अवस्था" आई  जेवू देईना आणि बाप भीक मागू देईना" अशी झाली आहे.  सध्या सोलापूर शहर खड्डेपूर म्हणून ओळखला जाऊ लागलं असून ' खड्डेच खड्डे चोहीकडे, रस्ता गेला कुणीकडे..? असा प्रश्न विचारण्याची वेळ सोलापूरकरांवर आली आहे. पाऊस पडल्यानंतर स्मार्ट सिटीच्या कामाचे पोस्टमार्टम बाहेर पडलंअसून स्मार्ट सिटीच्या अंतर्गत झालेली सर्व कामे बोगस आणि भ्रष्टाचाराने माखलेली असल्यामुळे पाऊस आणि रस्त्यावरील खड्डे जणू समीकरणच होऊन बसलंय. थोडा जरी पाऊस आला तरी रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्यामुळे वाहन चालकांना वाहन चालवताना तारेवरची कसरत करावी लागत असून अपघात आला तोंड द्यावे लागत  आहे. दरवर्षी पावसाळ्यात सर्वच ठिकाणी रस्त्यावर खड्याचे साम्राज्य निर्माण होते. परंतु सध्या पाऊस कमी असताना झालेल्या थोड्या पावसाने सुद्धा संपूर्ण सोलापूर शहरातील रस्त्यांची वाट लागली असून सर्व रस्त्यांची चाळण झाल्यामुळे ये-जा करणे कठीण झाले आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहन चालवताना चालकांना जीव मोठी धरून वाहने चालवावी लागत आहेत. त्यातच ट्राफिक पोलीस वाहनांची आडवाडवी करत असल्यामुळे छोटे-मोठे अपघात होत असून हे अपघात खट्यामुळेच होत असल्याचे स्मार्ट सिटी चा निधी गिळून बसलेल्या मंडळीच्या लक्षात कधी येणार...? 
खड्डे मुक्त रस्ते कधी होणार...? 
ठेकेदार आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांची अभद्र युती  कधी नष्ट होणार...? 
सोलापूरकरांना चांगले रस्ते कधी मिळणार...? 
ज्या रस्त्यावर खड्डे पडतात त्या रस्त्या वरच त्या ठेकेदाराला आणून रस्त्याच्या झालेल्या खर्चापेक्षा डबल वसूल केल्याशिवाय किंवा त्या ठेकेदाराला काळी यादीत टाकल्याशिवाय तो ठेकेदार गोरे काम करणार नाही हे मात्र निश्चित...?

Reactions

Post a Comment

0 Comments