कर्मवीरांनी सर्वांना शिक्षणाची दारे खुली केली- नगराध्यक्षा ॲड.मिनलताई साठे - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, October 10, 2023

कर्मवीरांनी सर्वांना शिक्षणाची दारे खुली केली- नगराध्यक्षा ॲड.मिनलताई साठे

 कर्मवीरांनी सर्वांना शिक्षणाची दारे खुली केली- 

नगराध्यक्षा ॲड.मिनलताई साठे


माढा (कटूसत्य वृत्त):- रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक, पद्मभूषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांचा १३६ वा जयंती सोहळा उपळाई बुद्रुक येथील श्री नंदिकेश्वर विद्यालयात मोठ्या उत्साहात पार पडला.कर्मवीर जयंतीनिमित्त गावातून मिरवणूक काढण्यात आली होती.पद्मभूषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 136 व्या जयंतीनिमित्ताने आयोजित सभेच्या कार्यक्रमाची सुरुवात विद्यालयाच्या मैदान सपाटीकरण कामाच्या भूमिपूजनाने झाली.कार्यक्रमाच्या अध्यक्षा,माढा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा,ॲड.सौ. मिनलताई साठे,कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सोलापूर जिल्ह्याचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी सचिन कवले ,प्रमुख वक्ते कला व वाणिज्य महाविद्यालय माढाचे प्राचार्य डॉ. सुनील हेळकर,रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीचे सदस्य ॲड.बाळासाहेब पाटील  यांच्या हस्ते कुदळ टाकून झाले.

         पद्मभूषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील व रयतमाऊली सौ.लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.विद्यालयाचे मुख्याध्यापक  दशरथ देशमुख यांनी शाखेचा इतिहास व आजपर्यंतची शाळेची वाटचाल याचा आढावा आपल्या प्रास्ताविकात घेतला. इ.10 वी तील गुणवंत विद्यार्थ्यांचे व कर्मवीर जयंती निमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धातील विजेत्यांचे मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.पुणे विभागीय मैदानी स्पर्धेसाठी निवड झालेल्या सर्व विद्यार्थिनींना मान्यवरांच्या हस्ते मेडल आणि पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. या सर्व विद्यार्थिनींना मार्गदर्शन करणारे विद्यालयाचे क्रीडाशिक्षक  शब्बीर तांबोळी सर यांना उत्कृष्ट क्रीडा शिक्षक म्हणून सर्व मान्यवरांच्या शुभहस्ते गौरविण्यात आले. रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीचे सदस्य ॲड.बाळासाहेब पाटील म्हणाले,कर्मवीर म्हणजे ज्ञानगंगा खेड्यापर्यंत पोहोचवणारे आधुनिक भगीरथ आहेत.व्याख्याते कला व वाणिज्य महाविद्यालय माढाचे प्राचार्य डॉ.सुनील हेळकर म्हणाले,कर्मवीर अण्णांनी फार मोठे सामाजिक कार्य शिक्षणाच्या माध्यमातून केले.शिक्षण हे समाज परिवर्तनाचे साधन आहे हे कर्मवीरांनी ओळखले.सोलापूर जिल्ह्याचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी  सचिन कवले साहेब म्हणाले,गावातील दर्जेदार अधिकारी घडविण्यात रयत शिक्षण संस्थेच्या  नंदिकेश्वर विद्यालयाचा मोठा वाटा आहे. विद्यालयातील सर्वच उपक्रम कौतुकास्पद आहेत.माढा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा ॲड.सौ.मिनलताई साठे म्हणाल्या, कर्मवीर अण्णांवर छत्रपती शाहू महाराजांचा प्रभाव होता. त्यांचे विचार कर्मवीरांनी आपल्या कार्यातून पुढे नेले.माणुसकी हा एकमेव धर्म मानून वाटचाल करण्याचे त्यांनी आवाहन केले.कर्मवीर अण्णांनी सर्व जात,धर्म पंथांच्या लोकांसाठी शिक्षणाचे दार खुले केले.

         याप्रसंगी स्कूल कमिटीचे चेअरमन सिताराम गायकवाड, स्कूल कमिटी सदस्य  कृष्णा घाडगे,ॲड.नानासाहेब शेंडे, माढा नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षा सौ.कल्पनाताई जगदाळे ,उपळाई बुद्रुक च्या नूतन सरपंच सौ.सुमनताई माळी,उपळाई बुद्रुकचे उपसरपंच  नागनाथ गुंड,उपळाई बुद्रुकचे माजी सरपंच  मनोहर गायकवाड,उपळाई बुद्रुक तंटामुक्त समितीचे अध्यक्ष  मल्लिकार्जुन झाडबुके  विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक औदुंबर गायकवाड, प्र.पर्यवेक्षक  नागेश बोबे ,रा.स.प चे सोलापूर जिल्हा.उपाध्यक्ष  गोरख वाकडे, धनंजय बेडगे,अजितसिंह देशमुख सौ. स्वरूपादेवी देशमुख बाळू नागटिळक दिगंबर माळी, नागनाथ दसंगे, पोलीस पाटील  जावेद तांबोळी,सेवानिवृत्त शिक्षक  अब्दुलरहीम पठाण  शिवाजी लोंढे व रामचंद्र माळी सेवानिवृत्त प्राध्यापक  नागनाथ जाधव ,सौ.माधवीताई शिंदे, श्रीम.शशिकला नकाते,सौ.अर्चनाताई शेंडे, दादा माळी , विनोद वाकडे,सौ.साधनाताई आखाडे,जाफर तांबोळी, गणेश वागज,  संतोष वागज, रामदास देशमुख, हनुमंत शिंदे, हनुमंत  डुचाळ यांच्यासह विद्यालयातील सर्व शिक्षक,शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी तसेच उपळाई बुद्रुक व पंचक्रोशीतील ग्रामस्थ आदी उपस्थित होते. शब्बीर तांबोळी  यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तसेच उपस्थितांचे आभार मानले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages