अनगरच्या अनिता लांडगे गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित
अनगर (कटूसत्य वृत्त):- अखिल भारतीय सानेगुरुजी कथामाला समिती सोलापूर यांच्या वतीने देण्यात येणारा यमुनाबाई बाबुराव राजमाने स्मृती गुणवंत शिक्षक पुरस्कार अनगर येथील कै. शंकरराव बाजीराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील सहशिक्षिका अनिता अर्जुन लांडगे यांना सोलापूर येथे निर्मलकुमार फडकुले सभागृहात महाराष्ट्र राज्याचे माजी शिक्षण संचालक गंगाधर म्हमाने यांच्या शुभहस्ते समारंभ पूर्वक प्रदान करण्यात आला. पुरस्काराबद्दल संस्थेचे मार्गदर्शक माजी आमदार राजन पाटील, लोकनेते साखर कारखान्याचे चेअरमन विक्रांत उर्फ बाळराजे पाटील, सोलापूर विद्यापीठाचे सिनेट सदस्य अजिंक्यराणा पाटील, प्राचार्य चंद्रकांत ढोले, प्राचार्य डॉ. चंद्रकांत सूर्यवंशी, मुख्याध्यापक विश्वजीत लटके, मुख्याध्यापक रामचंद्र पाटील, उपमुख्याध्यापक सिताराम बोराडे, पर्यवेक्षक चंद्रकांत यावलकर यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले.
0 Comments