Hot Posts

6/recent/ticker-posts

स्वच्छतेचा नुसताच फार्स...! हातात झाडू...! फोटो काढू...!!

 स्वच्छतेचा नुसताच फार्स...! हातात झाडू...! फोटो काढू...!!


सोलापूर (दादासाहेब नीळ):- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशभरामध्ये' स्वच्छता हीच सेवा' असा नारा देत एक तास सर्वांनी श्रमदान करण्याचे आवाहन केल्यानंतर रविवारी त्याला देशभरातून फक्त देखाव्या पुरता आणि फोटो काढण्यापुरता मोठा प्रतिसाद मिळाला असल्याचे वास्तव आहे.
स्वच्छतेसाठी देशवासीयांचे श्रमदान हेच महात्मा गांधींना जयंतीनिमित्त श्रद्धांजली ठरेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच मन की बात या कार्यक्रमातून सांगितले होते. त्यानुसार अनेकांनी हातात झाडू घेत फक्त फोटो काढेपर्यंतच स्वच्छता करून ताबडतोब घर गाठणे पसंत केल्याचे दिसून आले.
 पंतप्रधानांचा आदेश म्हणून काही जणांनी फक्त स्वच्छतेचा फार्स केला, आणि फक्त हातात झाडू आणि फोटो काढू एवढ्या पुरताच या स्वच्छता अभियानामध्ये सहभाग घेऊन काढता पाय घेतला.
या स्वच्छता अभियानामध्ये लाखो लोक सहभागी झाले असले तरी काही अपवाद वगळता असंख्य नागरिकांनी फक्त फोटो काढण्यापुरताच स्वच्छतेमध्ये सहभाग घेऊन एक प्रकारे सवंग लोकप्रियतेसाठी आणि प्रसिद्धीसाठीच काहीजणांनी यामध्ये सहभाग नोंदवल्याचे दिसून आले. अनेक शासकीय कर्मचाऱ्यांनी हातात झाडू  व्हिडिओ आणि फोटो काढण्यापुरताच धरला आणि त्यानंतर मात्र तो टाकून दिला. रस्ते किंवा शहरे स्वच्छ होण्याअगोदर माणसांची मने स्वच्छ झाली पाहिजे.  त्यानंतर बाहेरची स्वच्छता सहज करता येईल. असे थोर समाज सुधारक संत गाडगे महाराज यांनी जाहीरपणे सांगितलं आहे. संत गाडगे महाराज दिवसभर हातात खराटा घेऊन गावे स्वच्छ करत आणि रात्री कीर्तनातून समाज प्रबोधन करत. सध्या प्रत्येक माणसाच्या मनामध्ये प्रचंड मोठी घाण अनेक वर्षापासून साठले आहे. ती घाण बाहेर काढल्याशिवाय गावे शहरे कधीच स्वच्छ होणार नाहीत. फक्त व्हिडिओ आणि फोटो काढण्यापूर्ती मर्यादित स्वच्छता मोहीम म्हणजे भारत स्वच्छ असे म्हणता येणार नाही. देशव्यापी स्वच्छता अभियान होण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी तन मन आणि धन अर्पण करून स्वच्छतेसाठी वेळ दिला पाहिजे. परंतु तसे होताना दिसत नाही. स्वच्छता हेच देवाचे दुसरे नाव असले तरी अनेकांना ते दिसत नाही त्यामुळे घरातील कचरा रस्त्यावर टाकून तो कचरा उचलण्यासाठी ग्रामपंचायत किंवा महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना मोठमोठ्याने भांडणारे आपणच...! आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदेश दिल्यामुळे नुसताच फोटो काढण्यापुरता खराटा धरून स्वच्छता केल्याचा आव आणणारे सुद्धा आपणच..! कोणत्याही प्रकारे नुसता आव आणून किंवा देखावा करून स्वच्छता होणार नाहीच . त्यासाठी महात्मा गांधीजी यांनी सांगितलेल्या विचारवाटेवरून आपण चालण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण स्वच्छता ही सामाजिक जबाबदारी आहे आणि स्वच्छता पाळणे हे सर्वांचे कर्तव्य आहे. शाळेमध्ये स्वच्छतेचे अनेक धडे शिकून सुद्धा स्वच्छतेसाठी आपण कधीच पुढे आलो नाही.  त्यासाठी आपल्याला स्वच्छता मोहिमेची वाट बघावी लागते हे विशेष... स्वच्छ भारत योजनेची घोषणा जरी सोशल मीडियाच्या माध्यमातून घरोघरी पोचले असली तरी घरातला प्रत्येक माणूस स्वच्छतेत आला नाही तर बोटावर मोजणे एवढ्याच काही नागरिकांनी स्वच्छतेत सहभाग घेतला काही अपवाद वगळता तोही केवळ फोटो साठी आणि प्रसिद्धीसाठी महात्मा गांधीजींच्या स्मरण दिनाच्या निमित्ताने त्यांच्या आशीर्वादाने विचाराचा अनुकरण करावे. यासाठी गांधी जयंती साजरी केली जाते. महात्मा गांधीजींनी दिलेल्या विचारांच्या संस्काराची शिदोरी समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत जोपर्यंत पोचणार नाही तोपर्यंत देश आणि स्वच्छता ही कागदावरच राहील. या स्वच्छता मोहिमेमध्ये जोपर्यंत सामान्य नागरिक माझा देश हेच माझं घर आहे असा विचार घेऊन जोपर्यंत पुढे येणार नाही तोपर्यंत स्वच्छता अभियान कागदावरच राहील. जोपर्यंत सरकारी अधिकारी आपली भट्टीचे कपडे आणि आपले स्टेटस घरी ठेवून खऱ्या अर्थाने स्वच्छता अभियान मध्ये प्रामाणिकपणे उतरणार नाहीत तोपर्यंत हे स्वच्छता अभियान कागदावरच राहील. त्यामुळे केवळ महात्मा गांधीजींचे स्मरण करण्यासाठी त्यांची आंधळी भक्ती करणाऱ्या अंध भक्तांनी केवळ स्वच्छतेचा देखावा करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सुद्धा फसवणूक केली असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.
अस्वच्छतेमुळे निर्माण होणाऱ्या आरोग्याच्या आणि पर्यावरणाच्या समस्या आणि त्या संदर्भामध्ये सामान्य नागरिकांचे प्रबोधन होणे गरजेचे आहे.
Reactions

Post a Comment

0 Comments