शिवकालीन शस्त्रांचे 5 व 6 ऑक्टोबर रोजी सोलापुरात मोफत प्रदर्शन...!
रवि मोहिते यांची माहिती...!!
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 व्या राज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून कोल्हापूर येथील गोकुळ दूध संघाच्या वतीने सोलापुरातील गोविंद श्री मंगल कार्यालयामध्ये दिनांक 5 आणि 6 ऑक्टोबर 2023 रोजी साधारणपणे 500 शिवकालीन शस्त्रांचे मोफत प्रदर्शन भरविण्यात आल्याची माहिती रवि मोहिते यांनी श्रमिक पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
पत्रकार परिषदेत पुढे बोलताना मोहिते म्हणाले की, " महाराष्ट्र राज्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा उत्तम वारसा लाभला असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजनीति कौशल्याने महाराष्ट्राची वाटचाल सुरू आहे. आणि या वाटचालीची स्मृती आणि प्रेरणा सातत्याने सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचत राहावी आणि हे रयतेचे राज्य लोकाभिमुख व्हावे याच स्वच्छ विचारधारेतून छत्रपती शिवरायांच्या 350 वा राज्याभिषेक दिनानिमित्त सर्वत्र हर्ष उल्हास साजरा व्हावा. या अनुषंगाने कोल्हापूर येथील गोकुळ दूध संघाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवकालीन राजनीती आणि युद्धनीती विषयी शहर जिल्ह्यातील सामान्य नागरिक, विद्यार्थी ,विद्यार्थिनी, पालक, आणि तमाम जनतेला माहिती प्राप्त व्हावी याच हेतूने दिनांक पाच व सहा ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी नऊ ते रात्री आठ वाजेपर्यंत हे प्रदर्शन मोफत भरविण्यात आले आहे.
या प्रदर्शनाचे उद्घाटन कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघाचे चेअरमन अरुण कुमार डोंगळे यांच्या शुभहस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोलीस आयुक्त राजेंद्र माने उपस्थित राहणार आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार वाघचवरे, सूर्यकांत पाटील, प्रशांत पाटील, व्यंकटेश पटवारी, दत्तामामा मुळे, शिवा बाटलीवाला( कांबळे), सचिन जवळकोटे, मनीष केत ,सिद्धाराम वाघ, अरुण साठे , आणि श्रीकांत डांगे आदी मान्यवर कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत.
विशेष म्हणजे गोकुळ दूध संघाचे सर्व संचालक या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार असल्यामुळे सोलापूर मध्ये सुद्धा वाढत्या बेकारीला आळा घालण्यासाठी कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ सहकारी तत्त्वावर सुरू झालेला नामांकित गोकुळ दूध संघाने सध्या आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये अव्वल दर्जाचे स्थान निर्माण केल्यामुळे गोकुळची संस्था सोलापूरमध्ये आपण झाली तर अनेकांच्या हाताला काम मिळेल असा विश्वास यावेळी रवी मोहिते यांनी व्यक्त केला आहे.
या पत्रकार परिषदेला मनीष सूर्यवंशी, मनमोहन चौगुले ,प्रदीप वानखेडे, संतोष घोडके, आणि शाम कदम उपस्थित होते.
.png)
0 Comments