Hot Posts

6/recent/ticker-posts

ओबीसी समाजाने आपल्या न्याय हक्कासाठी एकत्र येणे गरजेचे - रमेश बारसकर

 ओबीसी समाजाने आपल्या न्याय हक्कासाठी एकत्र येणे गरजेचे

 - रमेश बारसकर


मोहोळ (कटूसत्य वृत्त):- ओबीसी समाजाने स्वतःच्या न्याय हक्कासाठी एकत्रित येणे हे गरजेचे आहे,ती काळाची गरज आहे. हीच ती वेळ आहे असे सांगत कुर्डूवाडी ता माढा येथे होणाऱ्या 31 ऑक्टोबरच्या "ओबीसी यल्गार परिषद"देत ओबीसी समाजातील सर्व जाती धर्मातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे अवाहन ज्योती क्रांती परिषदेचे प्रदेशाध्यक्ष रमेश बारसकर यांनी केले.

मोहोळ येथे शनिवार ता 30 रोजी आयोजित करण्यात आलेल्या विचार विनिमय बैठकीत ते बोलत होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी समता परिषदेचे विभागीय अध्यक्ष दत्तात्रय घाडगे होते. यावेळी व्यासपिठावर भटक्या विमुक्त समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष मच्छिंद्र भोसले,

उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश जाधव,शंकर गोरे ,मधुकर बनसोडे शंकर वाघमारे ,सागर पडघळ,विनोद कांबळे, मारूती रोकडे,स्वप्निल जानराव,विशाल गोडसे, डॉ सागर बोराटे,विकी घुगे,शिलवंत क्षीरसागर,मंगेश पांढरे आदी सह जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यातील कार्यकर्ते तसेच उस्मानाबाद, तुळजापूर, पुणे इंदापूर, बारामती या ठिकाणा वरून ही पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या वेळी या बैठकीत विविध ठराव करण्यात आले. त्यात मराठा समाजाला ओबीसीच्या कोटयातून आरक्षण न देता स्वतंत्र आरक्षण द्यावे,धनगर समाज व भटक्या विमुक्त समाजास एस टी प्रर्वगातून आरक्षण द्यावे,ओबीसींची जातनिहाय जन गनणा झाली पाहिजे,

विधानसभा व लोकसभेत ओबीसींना आरक्षण द्यावे,ज्योती क्रांती परिषदेचे प्रदेशाध्यक्ष रमेश बारसकर यांना "ओबीसी जननायक" ही पदवी प्रदान करावी अशा प्रकारचे ठराव करण्यात आले. दरम्यान कुर्डूवाडी येथे 31 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या ओबीसी एल्गार परिषदेला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचा निर्धार पदाधिकारी कार्यकर्ते यांनी व्यक्त केला.
Reactions

Post a Comment

0 Comments