Hot Posts

6/recent/ticker-posts

प्राथमिक शिक्षक संघाचा विराट आक्रोश मोर्चा...!

 प्राथमिक शिक्षक संघाचा विराट आक्रोश मोर्चा...! 

चार पुतळा चौकातून मोर्चा पुनम गेटवर जाऊन धडकला..!!


सोलापूर (कटूसत्य वृत्त):- गेल्या अनेक वर्षापासून शिक्षकांना शिकवण्याचे पवित्र काम बाजूला ठेवून सरकार अशैक्षणिक कामे लावू लागल्यामुळे गुणवत्ता  सुद्धा घसरू लागलेली आहे. काही लोकप्रतिनिधी शिक्षकांचा अपमान करतात.  हे थांबलं पाहिजे.  आणि शिक्षकाकडून फक्त शिकवण्याचं कार्य झालं पाहिजे. आणि अशैक्षणिक कामे बंद झाली पाहिजेत.  आणि जुनी पेन्शन योजना सुरू झाली पाहिजे. 2005 नंतर बंद असलेली शिक्षक भरती पुन्हा सुरू करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या औचित्य साधून सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने माजी अध्यक्ष म.ज. मोरे जिल्ह्याचे नेते बब्रुवाहन काशीद, राज्य सल्लागार मंडळाचे अध्यक्ष लहू कांबळे, राष्ट्रीय कार्याध्यक्ष तात्या यादव  मार्गदर्शनाखाली हा   विराट आक्रोश मोर्चा गांधी जयंतीचे औचित्य साधत  दुपारी दोन वाजता चार पुतळा चौकातून  निघाला.   हा मोर्चा पुनम गेट येथे जाऊन धडकला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी कांबळे यांना विविध मागण्या संदर्भात शिक्षक संघाच्या वतीने निवेदन देण्यात आले. याप्रसंगी म.ज .मोरे  अनिरुद्ध पवार लहू कांबळे बब्रू वाहन काशीद सूर्यकांतडोगे, रणजीत थिटे,  दिलीप ताटे,  हनुमंत सरडे,  मैंदर्गी,  शेळके  आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.  शिक्षक नेत्यांनी आपल्या मनातील भावनांना वाट मोकळी करून दिली .सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष अनिरुद्ध पवार  यांनी शिक्षक हा वेठबिगार नसून विद्यार्थ्यांना ज्ञानदान करण्याचं पवित्र कार्य करत असल्याचे सांगितले.  
यावेळी बोलताना पवार म्हणाले की, "
आम्हाला फक्त शिकवू द्या या एकच लक्षवेधी मागणीसाठी प्राथमिक शिक्षक संघ रस्त्यावर उतरला असून याबरोबरच राज्य शासनाच्या स्तरावर संघाच्या माध्यमातून  _* शाळाबाह्य कामे बंद करा  * जुनी पेन्शन योजना सुरू करा  
* सरकारी शाळा कार्पोरेट कंपन्यांना देऊ नका.
* शिक्षणाचे खाजगीकरण थांबवावे.
* लोकप्रतिनिधींनी अवमानकारक वक्तव्य थांबवावीत.
* शिक्षकांना मुख्यालयात राहण्याची रद्द करावी.
* संच मान्यतेतील त्रुटी दूर कराव्यात.
* एम एस आय टी ची अट शिथिल करावी.
* नवीन शिक्षक भरती पूर्वीप्रमाणे जिल्हा अंतर्गत व Surf जिल्हा बदली प्रक्रिया राबविण्यात यावी.
* शिक्षण 10-20-30 आश्वासित प्रगती योजना सुरू करावी.
* सर्व थकीत बिलांसाठी त्वरित अनुदान मंजूर करावे. या मागण्या घेऊन  उपस्थित शिक्षकांनी सरकारला धारेवर धरले.   जिल्हा परिषद स्तरावरील मागण्या : -

* प्रलंबित असलेली केंद्रप्रमुख पदोन्नती प्रक्रिया पार पाडावी.
* मी नंतरच्या उर्वरित शिक्षकांना मुख्याध्यापक पदोन्नती द्यावी.
* मान्य टक्केवारीनुसार विशेष शिक्षकांना पदवीधर वेतनश्रेणी द्यावी.
* दरवर्षी 20 टक्के प्रमाणे मागील अणुशेषासह निवड श्रेणीचा लाभ देण्यात यावा.
* आणि तालुका निहाय कार्यशाळा लावून शिक्षकांच्या सेवा पुस्तकाची पडताळणी करावी.  या प्रमुख मागण्या घेऊन प्राथमिक शिक्षक  संघाने जन आक्रोश मोर्चा च्या माध्यमातून लक्षवेधी घोषणा देत सरकारकडे विविध मागण्यांचे निवेदन दिले या मोर्चासाठी मनपा राज्य सरचिटणीस संजय चेळेकर,  जिल्हा संघ मार्गदर्शक आप्पासाहेब देशमुख,  राज्य उपाध्यक्ष विजय तडकलकर,  राम म्हमाने, दिगंबर शेळके,नागनाथ  क्षीरसागर,   राजेंद्र वायसे,  सुहास कुलकर्णी,  हरिभाऊ जाधव,  सूर्यकांत हत्तुरे,  रणजीत थिटे, दिलीप ताटे ,महादेव जठार,  चंदाराणी आतकर ,सीता नामवार,  दमयंती पाटील ,अश्विनी Sach ,संचालक गुलाबराव पाटील ,हनुमंत सरडे,  तानाजी गुंड ,सत्यवान जैन जांगडे , राजेंद्र आवारे ,रमेश शिंदे   आदी पदाधिकारी आणि जिल्ह्यातील बहुसंख्य शिक्षक या  स्वयंस्फूर्तीने या मोर्चात सहभागी झाले होते. आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी जिल्ह्यातील सर्व शिक्षकांनी एकजुटीने या मोर्चामध्ये सहभागी होऊन आपला आवाज बुलंद केला.
या मोर्चामध्ये बहुसंख्य शिक्षकांनी सहभागी होत विविध घोषणाच्या माध्यमातून सरकारला एकजुटीच्या माध्यमातून इशारा दिला.

Reactions

Post a Comment

0 Comments