Hot Posts

6/recent/ticker-posts

नवीन पिढी संपविण्याचा समाजकंटकांचा ठेका....! कुठं नेऊन ठेवलाय गणेश उत्सव लेका.......!!

 नवीन पिढी संपविण्याचा समाजकंटकांचा ठेका....!

कुठं नेऊन ठेवलाय गणेश उत्सव लेका.......!!


सोलापूर (कटूसत्य वृत्त):- समाजामध्ये समता आणि सामाजिक एक वाक्यता राहावी या हेतूने सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात झाली असली तरी सध्या मात्र सर्वांनाच या शिकवणीचा विसर पडला असून अनेक हात डॉल्बी आणि भंपक नाच गाण्यातच अडकून पडल्याचे दिसत आहे. कर्ण कर्कश डॉल्बीच्या आवाजामुळे आणि भंपक ,  रिमिक्स गाण्यांच्या थयथयाटामुळे उत्सवाच्या शांततेला बाधा येत आहे. विधायक आणि सामाजिक उपक्रमांना अनेक मंडळे फाटा देत असल्यामुळे कोणत्याही प्रकारचे दिशादर्शक आणि प्रेरणादायी उपक्रम होत नसल्यामुळे "कुठे नेऊन ठेवलाय गणेशोत्सव माझा" असे म्हणण्याची वेळ आज सुजाण नागरिकांवर आलेली आहे. लाखो रुपयांचा चुरडा फक्त मिरवणुकावर होत असल्यामुळे आणि त्यातून कोणते प्रकारचे समाज हित नसल्यामुळे या सर्वातून तरुण पिढी उध्वस्त मोठ्या प्रमाणात होत आहे. आजच्या नेत्यांनी आणि त्यांच्या काही बगलबच्चांनी विधायक उपक्रम न घेता गर्दी करणारे उपक्रम घेण्याचा प्रयत्न सुरू ठेवल्यामुळे गणेशोत्सव उत्सव न राहता व्यसनांचा अड्डा झालेला दिसत आहे वर्षानुवर्ष एकच प्रकारचा उत्सवाने त्यापुढे तोच तोच प्रयोग सातत्याने होत असल्यामुळे नवीन काही उपक्रम होत नसल्यामुळे या उपक्रमाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलू लागलेला आहे. या उत्सवांमधून  समता ,बंधुता, आणि एकता यांना तडे गेलेले आहेत. यामधून सुधारणे चे वारे वाहण्याऐवजी बिघाड झालेली गाडी तयार होत आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments