काँक्रीट रस्ता व गटार केल्याबद्दल नगरसेवक मुस्ताक शेख आणि दत्तात्रय
खवळे यांचा नागरिकांच्या वतीने सत्कार
मोहोळ (कटूसत्य वृत्त):- प्रभाग क्रमांक सहा व सात मध्ये जाणारा मुख्य रस्ता असणारा गेले अनेक दिवस रस्त्याची दुरावस्था आणि ड्रेनेजचे सांडपाणी रस्त्यावर येत असल्याने प्रभागातील नागरिकांची गैरसोय होत असल्याचे लक्षात घेत नगरसेवक मुस्ताक शेख आणि नगरसेवक दत्तात्रय अण्णा खवळे यांनी आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असणारा प्रश्न भूमिगत गटार व काँक्रीट रस्ता केल्याबद्दल प्रभागातील नागरिकांच्या वतीने दोन्ही नगरसेवक बांधवांचा सत्कार करण्यात आला. यावेळी गणपतीची आरती खवळे यांच्या हस्ते करण्यात आली.
या केलेल्या सत्काराला उत्तर देताना यापुढेही आपण विकास कामांसाठी आम्ही दोन्ही नगरसेवक प्रयत्नशील आहोत. यावेळी नागरिकांनी विजेच्या बाबतीत आणखी काही समस्या मांडल्या उर्वरित राहिलेल्या समस्या या पुढील काळात पूर्ण करण्याची ग्वाही यावेळी मुस्ताक शेख यांनी दिली.
यावेळी राजू सनगर आबा भोसले अनिल चोरमले आबा चोरमले नागेश पवार बिरूदेव शेजाऴ, समाधान चोरमले शुभम आदलिंगे, संजय सोनटके, रवि चोरमले,धुळा चोरमले, हनुमंत पसारे, सोमा काळे,अंकुश चोरमले, तानाजी चोरमले, सागर चोरमले, सुरज होनमाने, श्याम मस्के इत्यादी सह प्रभागातील नागरिक उपस्थित होते
.jpg)
0 Comments