Hot Posts

6/recent/ticker-posts

सोलापूर विद्यापीठाच्या युवामहोत्सवाला प्रारंभ

 सोलापूर विद्यापीठाच्या युवामहोत्सवाला प्रारंभ



सोलापूर (कटूसत्य वृत्त):- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूरविद्यापीठाच्या १९ युवा महोत्सवाचे उदघाटन मंगळवारी सकाळी ११.२० वाजता झाले. पंढरपूर (गोपाळपूर) येथील स्वेरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये युवा महोत्सवाला प्रारंभ झाला.

उदघाटन मुंबई विद्यापीठातील लोककला अकादमी विभाग प्रमुख डॉ.गणेश चंदनशिवे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर, खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य, कुलसचिव योगिनी घारे, प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे, विद्यार्थी विकास विभाग संचालक डॉ. केदारनाथ काळवणे, विद्यापीठाचे लेखाधिकारी श्रेणीक शहा आदी मान्यवर उपस्थित होते. डॉ. गणेश चंदनशिवे यांनी आपल्या सुंदर अदाकारीतून आपले मनोगत सादर केले. माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होतीया काहिली...हे गीत सादर करून उपस्थित विद्यार्थ्यांची माने जिंकली. 

Reactions

Post a Comment

0 Comments