श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयातील आयसीयू हाउसफुल्ल
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयातील (सरकारी रुग्णालय) खाटांची संख्या ५५० आहे, तरीपण ७६३पर्यंत क्षमता वाढविली आहे. तरीसुद्धा सध्या हॉस्पिटलमध्ये एक हजार ६० रुग्ण उपचार घेत आहेत.
दुसरीकडे आता रुग्णालयातील 'आयसीयू' विभागही हाउसफुल्ल आहे. 'आयसीयू'ची गरज असलेला रुग्ण दाखल होण्यासाठी आल्यास त्याच्यावर उपचार करायचे कसे? असा प्रश्न रुग्णालय प्रशासनासमोर निर्माण झाला आहे. दरम्यान, सर्वोपचार रुग्णालय वगळता सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील कोणत्याच सरकारी दवाखान्यांमध्ये नवजात बालकांच्या उपचारासाठी काचेची पेटी उपलब्ध नाही. त्यातून सर्वोपचार रुग्णालयात बाळ आणेपर्यंत त्याचा जीव टांगणीला राहतो. काचेच्या पेटीत ठेऊन ताताडीचे उपचार सुरु होण्यावर मर्यादा येतात. विलंब लागतोय. जिवाला धोक राहतो हे वास्तव आहे.
0 Comments