मराठ्यांनो ६ ऑक्टोबरला कुर्डूवाडीत यावंच लागतंय
मनोज जरांगे च्या सभेला १५ ते २० हजार मराठा एकत्र येण्याची शक्यता -
मराठा क्रांती मोर्चा समन्वयक हर्षल बागल यांचा दावा
कुर्डूवाडी (कटूसत्य वृत्त):- सकल मराठा क्रांती मोर्चा माढा व करमाळा तालुक्याच्या वतीने मराठा आरक्षणाचे आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांची 6 ऑक्टोबर रोजी सकाळी नऊ वाजता संकेत मंगल कार्यालय समोर जाहीर मराठ्यांची विराट महासभा आयोजित केली असून, या सभेला गावा-गावातून कमीत कमी 15 ते 20 हजार मराठा समाज बांधव एकत्र येण्याची शक्यता मराठा क्रांती मोर्चा चे समन्वयक शिवव्याख्याते हर्षल बागल यांनी वर्तवली आहे .
समन्वयक संजय टोणपे , बाबा गवळी , दत्ता काकडे , सुरेश बागल , मच्छिंद्र कदम , सुहास टोणपे सतिश महिंगडे , नवनाथ कडबाने , प्रशांत बागल , शहर परिसरातील प्रतिष्ठित समाजबांधवांकडुन मराठा क्रांती मोर्चा समितीच्या वतीने 6 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या सभेचे जोरदार तयारी सुरू असल्याचे चित्र यावेळी पाहायला मिळाले.
मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळवण्यासाठी अंतरवाली सराटी येथे उपोषण करते म्हणून जरांगे पाटील यांच्या आंदोलनावरती पोलिसांचा झालेला लाठीचार्ज गोळीबार अश्रुद्रांचा मारा त्याच्या निषेधार्थ मागील काही दिवसाखालील कुर्डूवाडी माढा टेंभुर्णी करमाळा अशा प्रमुख शहरातून निषेदाचा तीव्र संताप व्यक्त केला जात होता. मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिलेला अल्टिमेट काही दिवसात संपला संपणार आहे त्यामुळे मनोज जरांगे पाटलांचा महाराष्ट्र दौरा सुरू असताना सोलापूर जिल्ह्यात पाच ठिकाणी सभा आयोजित केले गेले आहेत त्यापैकी कुऱ्हाडी येथील सभा ही एक मराठा आरक्षण आंदोलनातील एक ऐतिहासिक सभा म्हणून या सभेकडे पाहिले जाईल असे हर्षल बागल यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले आहे.
एका रात्रीत सरकार बनवताय मग मराठा आरक्षण का देऊ शकत नाही
मराठा आरक्षणाच्या आंदोलनामध्ये 1983 सालापासून अण्णासाहेब पाटील, जावळे पाटील , विनायक मेटे , आकाश शिंदे यांच्यासह एक 45 ते 50 युवकांनी आत्मबलिदान दिले आहे. अजून किती बलिदान दिल्यानंतर सरकारचे डोळे उघडणार . सरकार जर मराठा आरक्षणाच्या बाजूने गांभीर्याने विचार करत नाही. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये सरकारला मराठा समाज निवडणुकांमध्ये त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. केंद्रात आणि राज्यात एकच सरकार असून मराठा आरक्षण दोन्ही सरकारसाठी अवघड गोष्ट नसून जर रात्री तुम्ही सरकार तयार करू शकता तर मराठा आरक्षण का तयार करू शकत नाही?
समन्वयक हर्षल बागल

0 Comments