कुर्डूवाडी शहरातील हजारो महिला जरांगे पाटलांच्या पाठीशी
जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने भव्य आणि दिव्य कॅण्डल मार्च
माढा (कटूसत्य वृत्त):-जिजाऊ ब्रिगेडच्या नेतृत्वाखाली कुर्डवाडी शहर व परिसरातील सर्व महिलांनी जातीपातीचा उंबरा ओलांडून मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेले आंदोलन करते मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी कुरवाडी शहरांमध्ये गावदेवी पासून छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत भव्य अशा हजारो महिलांच्या उपस्थितीमध्ये कॅन्डल मार्च काढला .
गावदेवीची आरती करून या कॅन्डल मार्चला सुरुवात झाली शहरातील टेंभुर्णी मार्गावरून अहिल्यादेवी होळकर स्मारकाच्या समोरून महात्मा गांधी चौकातून छत्रपती शिवरायांना अभिवादन करत कॅन्डल मार्च शिवाजी महाराज चौकामध्ये येऊन सभेमध्ये रुपांतर झाले यावेळी कॅन्डल मार्च मधील महिलांनी आक्रमक भाषण देखील करण्यात आली मराठा आरक्षण ही समाजातील तळागाळातील शेतकऱ्यांच्या कामगारांच्या मुलाबाळांसाठी भविष्य घडवण्यासाठी महत्त्वाची गरज असल्याचे अनेकांनी बोलून दाखवले जिजाऊ ब्रिगेडच्या आव्हानामुळे शहर व परिसरातून हजारो महिला एकवटल्या होत्या.
प्रथमच एखाद्या आंदोलनात महिलांची लक्षणीय गर्दी
मराठा आरक्षणाच्या मागणी करता उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांच्या पाठिंब्यासाठी कुरवाडी शहरांमध्ये महिलांचा कॅन्डल मार्च काढण्यात आला त्या मार्चला कुर्डूवाडी शहराच्या इतिहासात एखाद्या आंदोलनामध्ये पहिल्यांदाच हजारोंच्या संख्येने महिला पाहायला मिळाल्या.
राज्य सरकारने महाराष्ट्रातील मराठा समाज बांधवांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावे.
मराठा आरक्षणामुळे मराठा समाजातील अनेक गरजूवंतांना शिक्षणामध्ये आणि नोकरीमध्ये फायदा मिळणार आहे आज पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये कोट्यावधी मराठा समाज बांधव एकत्र आला आहे आणि सरकारने फक्त बघायची भूमिका घेऊ नये व फसवणुकीची कोणतीही खेळी करू नये सरसकट कोणबी प्रमाणपत्र प्रत्येक मराठा समाज बांधवांना द्यावे . या कॅन्डल मार्चला जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने आव्हान केल्यानंतर हजारोंच्या संख्येने महिला उपस्थित राहिल्या त्याबद्दल सर्व समाजातील महिलांचे मी आभार मानते.
निताताई खटके पाटिल
(जिजाऊ ब्रिगेड - माढा तालुकाध्यक्ष )
0 Comments