Hot Posts

6/recent/ticker-posts

माढा तालुक्यातील शिक्षण क्षेत्रात महिलांचे योगदान महत्त्वाचे- आ. बबनराव शिंदे.

 माढा तालुक्यातील शिक्षण क्षेत्रात महिलांचे योगदान महत्त्वाचे

- आ. बबनराव शिंदे.      

         टेंभुर्णी मध्ये झाला कर्तुत्वान व्यक्तींचा सन्मान. 


    टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):-माढा तालुक्यातील शिक्षण क्षेत्रात शिक्षण संस्था चालवित असताना त्यामध्ये महिलांचे योगदान महत्त्वाचे आहे संस्था जरी घरातील प्रमुख व्यक्तींनी चालू केल्या असल्या तरी त्या चालवण्याची जबाबदारी ह्या महिला घेत आहेत हे महत्त्वाचे आहे तसेच सर्वच सत्कारमूर्तींचे कार्य मोठे आहे महेश मालक तर आपल्यासाठी अक्कलकोट होऊन स्वामी समर्थांचा आशीर्वादच घेऊन आले आहेत तसेच टेंभुर्णीचे देशमुख बंधूंनीही टेंभुर्णी चे नाव देश पातळीवर गाजवीत आहेत असे प्रतिपादन त्यांनी गौरव सोहळ्याच्या अध्यक्ष स्थानावरून केले टेंभुर्णी मध्ये दिनांक 6 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा वाजता पुष्पक मंगल कार्यालय येथे विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय आम्ही केल्याबद्दल गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये माननीय श्री.महेश (मालक) इंगळे अध्यक्ष वटवृक्ष स्वामी समर्थ संस्थान अक्कलकोट डॉ. जी. के देशमुख अध्यक्ष व्हीव्हीपी इन्स्टिट्यूट सोलापूर.बाळासाहेब देशमुख, संस्थापक देशमुख अँड कंपनी. टेंभुर्णी डॉक्टर विजयकुमार चोपडे. चोपडे हॉस्पिटल. टेंभुर्णी सुरजाताई योगेश बोबडे, प्रणितीताई रणजीतसिंह शिंदे, जयश्रीताई महेंद्र वाकसे, यांना मान्यवरांच्या हस्ते गौरव चिन्ह देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिन होदाडे यांनी केले त्यामध्ये त्यांनी कार्यक्रमाची संकल्पना सांगितली तसेच यावेळी प्रमुख पाहुणे प्राध्यापक महेंद्र कदम यांनी समायोजित मार्गदर्शन पर विचार म्हणाले यावेळी रावसाहेब देशमुख, योगेश बोबडे यांनी मनोगते व्यक्त केली तर जी के देशमुख सर सुरजाताई बोबडे, अजयश्रीताई वाकसे यांनी सत्कारास उत्तर देताना आभार व्यक्त केले. कार्यक्रमासाठी प्रमोद कुटे मा.सरपंच अनुराधा( काकी) बोबडे ,शांतीलाल बागवाले, मस्तुत सर ,पंडित देशमुख ,डी. के देशमुख सर, सोमनाथ हुलगे, प्रमोद तांबे ,पी. डी पाटील सर, विठ्ठल पाटील, महेश कोठारी, तनवीर मुलानी, रामभाऊ वाघमारे, हरिभाऊ सटाले , संदीप जाधव आदी मान्यवर उपस्थित होते सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दशरथ देशमुख मुकुंद सुतार एम के देशमुख सर एडवोकेट संतोष कानडे प्रकाश शिंदे अतुल देशमुख श्रीकांत लोंढे समाधान घडके अविनाश देशमुख परमेश्वर खरात या संयोजन समितीने परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप मोकाशी यांनी केले

Reactions

Post a Comment

0 Comments