माढ्यातुन तरुण बेपत्ता,माढा पोलिसांत नोंद
माढा (कटूसत्य वृत्त):- माढा शहरातील राजु सुरेश पवार हा तरुण बेपत्ता झाला आहे.पत्नी उज्ज्वला पवार यांनी पोलिसांत फिर्याद दिल्यानुसार बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे.शहरातील इन्डेन गॅस गोडाऊन जवळ राहत असलेला राजु पवार ७ ऑक्टोबर ला सकाळी ११ वाजता घरच्यांना महा ई सेवा केंद्रातून के.वाय.सी करुन येतो म्हणुन सांगुन गेला.मात्र तो घरी माघारी परतलाच नाही.त्याची शोधा शोध केली मात्र तो सापडून आला नाही.त्याची दुचाकी गाडी फक्त आढळुन आली आहे.माढा पोलिस राजु पवारचा शोध घेत आहेत.
0 Comments