मोहोळच्या क्रीडा संकुलाचा प्रश्न मार्गी लागणार...! वाढीव निधी ला हिरवा कंदील मिळणार...!! आ.यशवंत माने यांची माहिती.......!!! - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, October 10, 2023

मोहोळच्या क्रीडा संकुलाचा प्रश्न मार्गी लागणार...! वाढीव निधी ला हिरवा कंदील मिळणार...!! आ.यशवंत माने यांची माहिती.......!!!

 मोहोळच्या क्रीडा संकुलाचा प्रश्न मार्गी लागणार...! 

वाढीव निधी ला हिरवा कंदील मिळणार...!! 

 आ.यशवंत माने यांची माहिती.......!!! 



मोहोळ (कटूसत्य वृत्त):- सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर मोहोळ तालुका असूनही गेल्या अनेक वर्षापासून निधी अभावी या ठिकाणी विकासाचा बॅकलॉग पूर्ण करता आला नाही. परंतु सध्या मोहोळ तालुक्याचे धडाडीचे आमदार यशवंत माने हे अतिशय अभ्यासूपणे विविध योजनांचा निधी मोहोळ तालुक्यासाठी सातत्याने उपलब्ध करून मोहोळ तालुक्याला विकासाच्या वाटेवर आणण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. मोहोळ येथील क्रीडा संकुलासाठी मोहोळ नगरपरिषद हद्दीतील घाटणे रस्त्यावरील परिसरात जागा निश्चित करण्यात आली. त्यासाठी शासनाच्या वतीने पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर ही झाला. परंतु या निधीतून प्रशस्त आणि अदयावात संकुल उभा राहू शकत नसल्यामुळे शासनाकडे वाढीव निधी म्हणून 25 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली असून त्याला लवकरच हिरवा कंदील मिळणार असून हा प्रश्न मार्गी लागणार असल्याचे आमदार यशवंत माने यांनी सांगितलं.  मोहोळ येथील नव्याने मंजूरी मिळालेल्या  क्रीडा संकुलाच्या जागेची सिनेट सदस्य अजिंक्य राणा पाटील यांनी नुकतीच पाहणी केली.  या संदर्भात बोलताना अजिंक्यराणा म्हणाले, " वाडी व निधी संदर्भात सुधारित आराखडा बनवण्याचे आदेश देण्यात आले असून लवकरच त्यास हिरवा कंदील मिळेल.  आणि क्रीडा संकुलाचा प्रश्न मार्गी लागेल.  गेल्या अनेक वर्षापासून मोहोळ तालुक्यातील आणि शहरातील क्रीडाप्रेमींच्या मागणीला निश्चितच यश आले असून यासाठी आमदार यशवंत माने यांच्या प्रयत्नाला दाद दिली पाहिजे.  यावेळी नूतन तहसीलदार सचिन मुळीक, डॉ.योगेश डोके,  जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार,  गट विकास अधिकारी आनंदकुमार मिरगणे,  बांधकाम विभागाचे अभियंता अक्षय यादव,  तालुका क्रीडा अधिकारी सुप्रिया गाढवे, आनंदराव गावडे यांच्यासह सर्व पदाधिकारी नगरसेवक आणि अधिकारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages