निवडणुकीच्या तोंडावर घोषणांचा पाऊस....!
नागरिक म्हणतात अजून मिळाले नाही हाऊस....!!
सोलापूर (दादासाहेब निळ):- सत्तेवर येण्याच्या अगोदर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी घोषणांचा पाऊस पाडला होता. परंतु तो पाऊस देशांमध्ये कुठेच पडला नाही. नुसतेच ढग येऊन गेले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्व नागरिकांना पक्की घरे बांधून देण्याचा आश्वासन दिले होते परंतु हे घराचं स्वप्न स्वप्नच राहिलेलं आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजप जोरदार तयारी करत असल्याचे पुन्हा एकदा दिसत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा हे मोदी सरकार घोषणांचा पाऊस पाडू लागलं असून आई निवडणुकीच्या तोंडावर गॅसचे दर कमी करून नागरिकांच्या तोंडाला पाने पुसण्याचा उद्योग सरकारच्या माध्यमातून होत आहे. आता उज्वला गॅसचे दर सहाशे रुपये पर्यंत आणून ठेवण्यात आले आहेत. याचाच अर्थ असा निघतो की सरकारला स्वस्तामध्ये गॅस देणे परवडत असताना सुद्धा गेल्या चार साडेचार वर्षांपासून सामान्य नागरिकांची या सरकारने मोठ्या प्रमाणात लूट केल्यामुळे केवळ निवडणुकीच्या तोंडावर याचे दर कमी केल्यामुळे जनता खुश होण्याऐवजी नाराज झाल्याचे दिसत आहे. घोषणांचा पाऊस जरी सुरू केला असला तरी सामान्य जनता मात्र सरकारच्या या चालबाजीला येणाऱ्या काळामध्ये थारा देणार नाही. बेकारी, महागाई ,आणि उपोषणामुळे त्रासलेल्या नागरिकांना सरकारने दिलासा देण्याऐवजी मागच्या काळात मोठ्या प्रमाणात महागाई वाढवून लोकांची प्रचंड मोठी लूट केली जात आहे. सर्वसामान्य नागरिकाला सरकारने आधार देण्याऐवजी वाऱ्यावर सोडून दिलेला आहे. आता मात्र काही राज्य आणि लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर हे सरकार आश्वासनांचा पाऊस पाडण्याचा प्रयत्न करू लागले आहे. परंतु चाणाक्ष आणि हुशार जनता सरकारचा हा डाव उधळून लावेल. आणि येणाऱ्या काळात सरकारला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. अशी चर्चा सध्या मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. येणाऱ्या निवडणुकीमध्ये सर्व देशातील नागरिकांनी मोदी हटाव देश बचाव या उपक्रमामध्ये सहभागी होऊन एकत्र येण्याची गरज आहे तरच या देशातील लोकशाही आणि प्रादेशिक राजकीय पक्ष जिवंत राहतील. सर्व राजकीय पक्षांनी देखील भाजपला महागाई, बेरोजगारी यासारख्या महत्त्वाच्या प्रश्नावर सरकारला धारेवर धरले तरच या सरकारची डाळ शिजणार नाही. अन्यथा हे सरकार पुन्हा एकदा आपल्या डोक्यावर मिऱ्या वाटायला कमी करणार नाही. सरकारने नागरिकांना विनाकारण न लुटता विविध सेवा सुविधा दिल्या पाहिजेत. परंतु गेल्या नव वर्षांमध्ये मोदी सरकारने प्रचंड मोठ्या प्रमाणात देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी केली असून परदेश दौऱ्यावर करोडो रुपयांचा चुराडा केलेला आहे. एवढेच नव्हे तर देशातील सर्वसामान्य नागरिकांना मात्र वाऱ्यावर सोडून शेतकऱ्यांची अवस्था केविलवाणी करून ठेवलेली आहे.
0 Comments