Hot Posts

6/recent/ticker-posts

बाळराजे पाटील यांनी आ. माने यांच्या समवेत घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट...! विकास कामांवर चर्चा थेट....!!

 बाळराजे पाटील यांनी आ. माने यांच्या समवेत घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट...!  विकास कामांवर चर्चा थेट....!! 


सोलापूर (कटूसत्य वृत्त):- यंदा सोलापूर जिल्ह्यासह राज्यांमध्ये अनुकूल आणि चांगला पाऊस पडलेला नाही. सध्या शेतकरी राजा हवालदिल झाला असून तापमानामध्ये सध्या मोठ्या प्रमाणात वाढ होऊ लागली असून पावसाळा संपत आला तरी पुरेसा पाऊस न झाल्यामुळे भूजल पातळी खालावली आहे.  येणाऱ्या काळात सोलापूर जिल्ह्यासह मोहोळ तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई निर्माण होणार आहे.  परंतु त्या अगोदरच अतिशय हजरजबाबी पणे मोहोळ मतदार संघातील पाणीपुरवठा आणि इतर महत्त्वाच्या विकास कामाच्या संदर्भामध्ये सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची लोकनेते साखर कारखान्याचे चेअरमन बाराजे पाटील यांनी आमदार यशवंत माने यांच्या समवेत भेट घेऊन विविध विकास कामासंदर्भात थेट चर्चा केली आहे.  यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी मोहोळ तालुक्यातील विविध प्रश्न जाणून घेतले. रस्ते दळणवळण त्याचबरोबर विकासच्या वाटचालीचा आढावा यावेळी घेण्यात आला. एकंदरीत मोहोळ तालुका आणि तालुक्यातील जनतेसाठी सातत्याने विकासाची गंगा आणण्यासाठी आणि तालुक्यातील जनतेला विकासाला योग्य दिशा देण्यासाठी बाळराजे पाटील अखंडपणे प्रयत्नशील असल्याचं यावरून दिसत असल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे.  याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रकाश चवरे, रामदास चवरे,  संतोष ननवरे आदी उपस्थित होते.
Reactions

Post a Comment

0 Comments