Hot Posts

6/recent/ticker-posts

दूध उत्पादक शेतकऱ्यांना शिवामृत देणार बायोगॅस प्रकल्पासाठी अनुदान -"धैर्यशील मोहिते पाटील यांची माहिती"

 दूध उत्पादक शेतकऱ्यांना शिवामृत देणार बायोगॅस प्रकल्पासाठी अनुदान 

"धैर्यशील मोहिते पाटील यांची माहिती"



अकलूज (कटूसत्य वृत्त):- स्वयंपाक घरातील गॅसच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात होणारी वाढ तसेच शेतामध्ये रासायनिक खताचा मोठ्या प्रमाणात होणारा वापर कमी करण्यासाठी शिवामृत दुध उत्पादक सहकारी संघ दुध उत्पादक शेतकऱ्यांना बायोगॅस प्रकल्पासाठी अनुदान देणार असल्याची माहिती संघाचे चेअरमन धैर्यशील मोहिते पाटील यांनी दिली.
शिवामृत दूध उत्पादक सहकारी संघाची ४८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संघाचे चेअरमन धैर्यशील मोहिते पाटील यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या व उत्साही वातावरणात पार पडली. स्वागत व अहवालवाचन संघाचे कार्यकारी संचालक रविराज इनामदार देशमुख यांनी केले . एक ते दहा विषयांना सभासदांनी मंजुरी दिली .  मोहिते पाटील म्हणाले, सध्या शिवामृत दूध उत्पादक संघाचे दुग्धजन्य पदार्थाला बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात मागणी असल्याने विक्रीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसून येत आहे व भविष्यात दुग्धजन्य पदार्थाच्या उत्पादनासाठी एक लाखांचे उद्दिष्ट संघांने ठेवले  आहे.  त्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा निश्चित लाभ होणार आहे.  सध्या राज्यातील इतर संघाच्या दूध पावडर प्रकल्पामुळे आपल्या संघाला या दूध संघाशी स्पर्धा करावी लागत आहे . केंद्र सरकारच्या अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाने नुकत्याच जाहीर केलेल्या योजनेत शिवामृत दूध संघाने  दूध पावडर प्रकल्पाचा प्रस्ताव सादर केला आहे. संघाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात हा प्रकल्प पुर्णत्वास येइल व त्याचा स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी व दूध उत्पादक शेतकऱ्यांना चांगला दूध दर देण्यासाठी फायदा होइल असे सांगुन शिवामृत दूध संघ दुध उत्पादक शेतकऱ्यांसाठी बायोगॅस प्रकल्पाचे वितरण करणार आहे. हा प्रकल्प संघ स्थापनेपासून अखंडीत दूध पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना रू.५ हजार अनुदान तर सध्या दूध पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना रू. १ हजार अनुदान संघामार्फत देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
या वार्षिक सर्वसाधारण सभेस कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते पाटील , संघाचे व्हा चेअरमन दत्तात्रय भिलारे , संचालक हनुमंत शिंदे , उध्दवराव जाधव , विजय नरुटे , बाळासाहेब देशमुख , जगन्नाथ जाधव , त्रिंबक इंगळे , अरुण थिटे , सुरेश पिसे , सुभाष शिंदे , नारायण सालगुडे पाटील , भास्कर तुपे , बाळासाहेब पराडे , सचिन वाघमोडे , शरद साळुंखे , शारदा पिसे , माधूरी फडतरे , संजय गोरे , दादासाहेब शिंगाडे , हरिश्चंद्र मगर यांच्यासह सभासद व कामगार उपस्थित होते . अहवाल सालात देवाज्ञा झालेल्या श्रीमती लीलावती माने पाटील यांच्यासह मान्यवरांना संचालक संग्रामसिंह रणनवरे यांनी श्रध्दांजली अर्पण केली . सूत्रसंचालन सेक्रेटरी दिग्विजय माने पाटील यांनी केले तर आभार संचालक  अरविंद भोसले यांनी मानले.

Reactions

Post a Comment

0 Comments