Hot Posts

6/recent/ticker-posts

फताटेवाडी (प्रभाग क्रमांक दोन )येथील कृष्णा गणेश तरुण मंडळाच्या वतीने बहारदार आणि नयनरम्य टिपरी संघाने गणरायाला दिला आगळावेगळा निरोप...!

फताटेवाडी  (प्रभाग क्रमांक दोन )येथील  कृष्णा गणेश तरुण मंडळाच्या

 वतीने बहारदार आणि नयनरम्य टिपरी  संघाने गणरायाला दिला

 आगळावेगळा निरोप...! 


सोलापूर (कटू सत्य वृत्तl महाराष्ट्राचे आराध्य दैवत  बुद्धीची देवता असणाऱ्या लाडक्या गणरायाला तमाम गणेश भक्तांनी " पुढच्या वर्षी लवकर या"  गणपती बाप्पा मोरया असा जयघोष करत निरोप दिला.  फताटे वाडी येथील डॉक्टर योगीराज राठोड टिपरी व डान्स मार्गदर्शक, आधारस्तंभ फताटेवाडी ग्रामपंचायत सदस्य युवराज राठोड, उपसरपंच राजेंद्र जाधव यांनी गणेश विसर्जन मिरवणुकीला प्रमुख उपस्थित राहून गणेश भक्तांना मार्गदर्शन केले.  दहा दिवसाच्या गणेशोत्सवामध्ये कृष्ण गणेश तरुण मंडळाच्या वतीने विविध धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रम राबवून थाटामाटात गणेश उत्सव साजरा करून अतिशय उत्साहात गणपती विसर्जन सुद्धा करण्यात आले.  विशेष म्हणजे या गणेश उत्सवामध्ये महिला प्रवर्गाने अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद देत उत्कृष्ट टिपरी व डान्स च्या माध्यमातून भक्तांची मने जिंकली.  या अतिशय बहारदार गणेश उत्सवामध्ये अध्यक्ष मोहन चव्हाण, उपाध्यक्ष प्रताप पवार, सागर राठोड,  राम चव्हाण ,संजय राठोड,  टिंकू चव्हाण,  प्रवीण राठोड, माया राठोड,  अरुण राठोड,  रेश्मा  चव्हाण , खुशी चव्हाण रोशनी,  चव्हाण आदी पदाधिकाऱ्यांनी या उत्सवामध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला.  राष्ट्रीय मानव अधिकार  पार्टीच्या महिला पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष विद्याताई माने यांनी उत्कृष्टपणे मार्गदर्शन करून गणेश उत्सव साजरा केला.
Reactions

Post a Comment

0 Comments