Hot Posts

6/recent/ticker-posts

आता 'भीमा' नव्हे तर, पै.भीमरावदादा महाडिक सहकारी साखर कारखाना

 आता 'भीमा' नव्हे तर, पै.भीमरावदादा महाडिक सहकारी साखर कारखाना

भीमा च्या ४८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत नामांतरणासाठी सभासदांची

 एकमताने मंजुरी



 कुरुल (कटूसत्य वृत्त):- पंढरपूर-मंगळवेढा-मोहोळ या तिन्ही तालुक्याच्या सीमेवर सहकारी साखर कारखान्याची स्थापना करून हजारो शेतकरी आणि शेकडो कामगारांच्या  कुटुंबांचं कल्याण करणारे, ज्या माळावर कुसळं उगवत होती त्या भागाचं नंदनवन करणारे स्व. भीमरावदादा महाडिक हे शेतकऱ्यांचे खऱ्या अर्थाने कैवारी असून कारखान्याला भीमा सहकारी साखर कारखाना ऐवजी पै. भीमरावदादा महाडिक सहकारी साखर कारखाना असे नामांतर करण्यात यावे असा ठराव झाल्यानंतर याला सर्वानुमते सहमती मिळाल्याबद्दल खा. धनंजय महाडिक यांनी उपस्थितांचे आभार मानले.

 टाकळी सिकंदर (ता. मोहोळ) येथील भीमा सहकारी साखर कारखानास्थळी ४८ वी वार्षिक सर्व साधारण सभा पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी चेअरमन विश्वास धनंजय महाडिक हे होते. यावेळी व्यासपीठावर व्हाईस चेअरमन सतीश जगताप, कार्यकारी संचालक सूर्यकांत शिंदे, शिवाजी गुंड, तुषार चव्हाण, दादासाहेब शिंदे, बिभीषण वाघ, तात्या नागटिळक, राजेंद्र टेकळे, बाळासाहेब गवळी, अनिल गवळी, भाजपा तालुकाध्यक्ष सुनील चव्हाण, सिद्राम मदने, संभाजी कोकाटे, चंद्रसेन जाधव, संतोष सावंत, छगन पवार आदी उपस्थित होते.

 प्रारंभी स्व. भीमराव दादा महाडिक यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यकारी संचालक शिंदे यांनी विषय मांडल्यानंतर सभासदांनी हात उंचावून सर्व विषयांना एकमताने मंजुरी दिली. 



 यावेळी बोलताना खा. महाडिक म्हणाले की,  बायो सीएनजी ज्यूस टू इथेनॉल मिथेनॉल यासारख्या प्रकल्पांच्या माध्यमातून वाहने इथेनॉल वर चालविण्याचा दूरदृष्टी प्रयत्न कारखान्याचे चेअरमन विश्वराज यांनी ठेवला असून तसे त्यांचे प्रयत्नही सुरू आहेत. साडेसहा लाख टन उसाची नोंद चालू वर्षी कारखान्याकडे आली असून सभासद शेतकऱ्यांनी दर व काटा यावर विश्वास ठेवून पूर्वीप्रमाणेच सहकार्य करून यंदाचा गाळप हंगाम यशस्वी करावा असे आवाहन त्यांनी केले.

चेअरमन विश्वराज महाडिक म्हणाले की, तीन-चार वर्षात कारखान्याचा संघर्ष सुरू होता. बोटावर मोजणे इतक्या कारखान्यांना एनसीडीसी कर्ज मिळाले त्या कारखान्यांमध्ये आपल्या कारखान्याचेही कर्ज मंजूर झाले ते केवळ खासदार धनंजय महाडिक यांनी केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे व केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस अजित पवार यांच्यामुळेच ही मदत मिळाली. संस्था व सभासदांचे हित प्रथम डोळ्यासमोर ठेवून काही कठोर निर्णय घ्यावे लागलेत व ते भविष्यातील घेणार आहे. कारखाना कार्यस्थळावर डिस्टलरी व इथेनॉल ची चिमणी उभारण्याचा प्रयत्न आहे. उपपदार्थाची निर्मिती करणे गरजेचे आहे. फक्त साखर निर्मिती करणारे अनेक कारखाने बंद पडले आहेत. दोन लाख लिटर प्रतिदिन क्षमतेची डिस्टलरी मंजूर झाले असून दीड लाख लिटर प्रतिदिन क्षमतेचा प्रोजेक्ट रिपोर्ट तयार आहे. यामध्ये थेट उसाच्या रसापासून इथेनॉल बनवू शकतो साखर व उपपदार्थ निर्मिती मधूनच शेतकऱ्यांना जास्तीचा दर देण्यासाठी फायदा होईल. चालू वर्षी कारखान्याच्या वतीने साडेपाचशे बैलगाड्या, साडेचारशे छोटे ट्रॅक्टर गाड्या, १८५ मोठ्या गाड्या, पाच हार्वेस्टर अशी यंत्रणा चालू हंगामात कार्यान्वित होणार असून कारखान्याची सध्या परिस्थितीत आर्थिक स्थिती अत्यंत चांगले असून बिलाला यावर्षी कोणताही अडथळा येणार नसल्याचेही कारखान्याचे अध्यक्ष विश्वराज महाडिक यांनी सांगितले.

यावेळी कार्यालयीन अधीक्षक भाऊसाहेब जगताप, राजाराम बाबर, झाकीर मुलाणी, भारत पाटील, किसन जाधव, दिगंबर माळी, शिवाजी शेंडगे, लिंगराज शेंडगे यांच्यासह सर्व विभाग प्रमुख, सभासद शेतकरी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पांडुरंग ताटे यांनी केले.
Reactions

Post a Comment

0 Comments