Hot Posts

6/recent/ticker-posts

मोहोळ शहराने सर्वधर्मसमभावातून सांस्कृतिक एकोपा जपला- राजन पाटील

 मोहोळ शहराने सर्वधर्मसमभावातून सांस्कृतिक एकोपा जपला- राजन

 पाटील ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त रक्तदान शिबिर आणि विविध कार्यक्रम संपन्न



मोहोळ (कटूसत्य वृत्त):- मोहोळ शहर हे सर्वधर्म समभाव आणि सांस्कृतिक भक्तीभाव जपणारे शहर म्हणून गेल्या अनेक दशकापासून परिचित आहे. समता बंधुता आणि एकात्मता ही तत्व जपल्यामुळेच मोहोळ शहरातील सर्वधर्मीयांचा एकोपा अबाधित राहिला आहे. जातीधर्मामध्ये तेढ निर्माण करून राजकीय डाव साधणाऱ्या संधीसाधू पासून सर्वधर्मीयांनी दूर राहावे असे आवाहन माजी आमदार राजन पाटील यांनी केले.

अत्यंत पवित्र सण मानला जाणाऱ्या ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त मोहोळ येथील महबूबनगर यंग क्लबच्या वतीने आयोजित रक्तदान आणि खतना शिबिर, फळे वाटप तसेच शरबत वाटप सामाजिक उपक्रमप्रसंगी राजन पाटील बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पोलीस उपाधीक्षक अमोल भारती, पोलीस निरीक्षक विनोद घुगे,कौशिक गायकवाड, शहाजहान शेख, दत्ता महाराज पुराणिक मुस्ताक शेख कुंदन धोत्रे,बापू डोके, हेमंत गरड, रफिक हरणमारे, शकील शेख उपस्थित होते.या वेळी मार्गदर्शन करताना विनोद घुगे म्हणाले ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त आयोजित केलेला उपक्रम निश्चितपणे प्रेरणादायी असून रक्तदान शिबिर सारख्या उपक्रमामुळे अनेकांना जीवनदान मिळते. यावेळी कौशिक गायकवाड यांनीही मार्गदर्शन करताना महबूबनगर यंग क्लबच्या उपक्रमाचे आवर्जून कौतुक केले. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी रफिक हरणमारे, इम्रान शेख, इन्नुस शेख, पप्पु मुजावर, आरीफ तलफदार, जमिर शेख, सोनू तलफदार,नेहाल शेख,कदिर पठाण,दानेश शेख यांच्यासह महबूबनगर यंग क्लबच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

सध्या अपघाताचे प्रमाण वाढल्याने मुलांच्या दुचाकीवर आणि त्यांच्या हातातील मोबाईलवर कुटुंबप्रमुखांनी लक्ष देणे गरजेचे आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जातीधर्मामध्ये तेढ निर्माण करणारे मेसेज व्हायरल करून धार्मिक एकोपा आणि शांततेला काही घटक बाधा पोहोचवितात. अशा लोकांवर निश्चितपणे कारवाई सुरू असून प्रत्येक पालकाने आपल्या मुलांकडे अशा बाबतीत लक्ष द्यावे. महबूबनगर यंग क्लबने राबवलेला रक्तदान शिबीर आणि खतना उपक्रम निश्चितपणे संपूर्ण जिल्ह्यातील मंडळांना प्रेरणादायी असून असे उपक्रम अन्य मंडळांनीही राबवावेत.
अमोल भारती 
पोलीस उपाधीक्षक
Reactions

Post a Comment

0 Comments