Hot Posts

6/recent/ticker-posts

शिवरत्नच्या बीबीए महाविद्यालयात वन्यजीव सप्ताह साजरा

 शिवरत्नच्या बीबीए महाविद्यालयात वन्यजीव सप्ताह साजरा


अकलूज (कटूसत्य वृत्त):- शिवरत्न नाॅलेज सिटी  परिसरातील शिवरत्न इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजच्या बीबीए महाविद्यालयात शिवरत्न निसर्ग मंडळाच्या वतीने वन्यजीव सप्ताह  साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला शंकरराव मोहिते महाविद्यालयातील प्राणिशास्त्र विभागाचे डॉ. अश्विनी हेगडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अरविंद कुंभार  हे होते. यावेळी कीटकांची दुनिया या विषयावर डॉ. हेगडे यांनी व्याख्यान दिले. वन्यजीव म्हणजे केवळ वन्यप्राणी व पक्षी एवढेच नसून यात कीटकांना ही महत्त्वाचे स्थान आहे असे डॉ. हेगडे आपल्या व्याख्यातून सांगितले. मानवी समाजात कीटकांची भूमिका किती महत्त्वाची आहे हे स्पष्टीकरण देत आजच्या घडीला मानवी हस्तक्षेपामुळे कीटकांची संख्या घसरणीवर जात असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. या वेळी कु. नीती पटेल, कु. योगिता जाधव व पृथ्वीराज कारंडे या विद्यार्थ्यांनीही वन्यजीवावर आपले मत मांडले. कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रा. भारत साठे यांनी वन्यजीव संरक्षणाची शपथ दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. सविता उप्पल्ली यांनी केले. आभार प्रा. वसीम सय्यद यांनी मानले. सूत्रसंचलन प्रा. कु. स्नेहा धाईंजे यांनी केले. प्रा.नितिन कंगळे, कार्यालयीन कर्मचारी अमोल खरात, तुषार एकतपुरे व सौ.  आशा खंडागळे सह बीबीए अभ्यासक्रमाचे विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments