शिवरत्नच्या व्यवस्थापन महाविद्यालयात
जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमत्त व्याख्यान
अकलूज (कटूसत्य वृत्त):- शिवरत्न शिक्षण संस्था संचलित शिवरत्न इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज या व्यवस्थापन महाविद्यालयात जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमत्त व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या वेळी शंकरनगर येथील विजयसिंह मोहिते पाटील कॉलेज ऑफ नर्सिंग ॲंड मेडिकल रिसर्चमधील मानसशास्त्राचे प्राध्यापक देवेंद्र वर्दम हे व्याख्याते म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अरविंद कुंभार हे होते. दैनंदिन जीवनात जर आपल्या मनावर ताबा ठेवून आपण वागलो तर आपल्याला तणावमुक्त जीवन जगता येईल असे प्रतिपादन प्रा. वर्दम यांनी आपल्या व्याख्यानातून केले. मानसिक आरोग्य उत्तम ठेवायचे असेल तर निसर्गावलोकन करण्याची गरज आहे असे मत आपल्या अध्यक्षीय मनोगतातून व्यक्त केले. या वेळी कु. सिद्धी शेटे व महेश शिंदे या बीबीए प्रथम वर्गातील विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच प्रास्ताविक व सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. भारत साठे यांनी केले. आभार प्रा. कु. स्नेहा धाईंजे यांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक, प्राध्यापकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिवरत्न नाॅलेज सिटीतील विविध शाखेत शिक्षण घेण्यासाठी प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी मानसिक आरोग्य उत्तम राहावे तसेच वर्षभर चालणाऱ्या अभ्यासक्रमाच्या तणावाखाली वावरणाऱ्या विद्यार्थ्यांना झील तर सेवकांसाठी लक्ष्य हे कार्यक्रम दरवर्षी राबविले जातात. याचा उपयोग विद्यार्थी तसेच सर्व सेवकांचे मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत होते.
- सौ. शितलदेवी धैर्यशील मोहिते-पाटील अध्यक्षा, शिवरत्न शिक्षण संस्था शंकरनगर - अकलूज.
0 Comments